Viral News : पान खाण्याचा मोह जिवावर बेतला, लग्नात ‘स्मोक पान’ खाल्ल्याने १२ वर्षीय मुलीच्या पोटाला पडले छिद्र…


Viral News : एका लग्नात एका १२ वर्षाच्या मुलीने सुपारीचे ‘स्मोक पान’ खाल्ले. हे पान खाल्यामुळे तिच्या पोटात छिद्र पडले. हा धक्कादायक प्रकार बेंगळुरूमधून समोर आला आहे. हे प्रकरण इतके गंभीर झाले की, मुलीवर शस्त्रक्रिया करावी लागली आणि शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांना तिच्या पोटाचा मोठा भाग कापावा लागला.

घटना सोशल मिडियावर व्हायरल…

ही घटना सोशल मिडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. बेंगळुरू येथील एचएसआर लेआउट, येथे एका १२ वर्षांच्या मुलीने लग्नाच्या रिसेप्शनमध्ये ‘स्मोक पान’ खाल्लं. या प्रकारच्या पानामध्ये द्रव नायट्रोजनचा वापर केला जातो.

पान खाल्ल्यानंतर मुलीच्या पोटात अचानक दुखू लागले. काही वेळातच मुलगी वेदनेने तडफडू लागली. मुलीची प्रकृती बिघडत असल्याचे पाहून तिच्या पालकांनी तिला रुग्णालयात नेले. जेथे इंट्राऑपरेटिव्ह OGDoscopy द्वारे डॉक्टरांना मुलीच्या पोटात द्रव नायट्रोजन जास्त प्रमाणात असल्याने तिच्या पोटात छिद्र पडल्याचे दिसले.

दरम्यान, नारायणा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सांगितले की, मुलीची ढासळलेली प्रकृती पाहून तातडीने शस्त्रक्रिया करावी लागली. सध्या मुलगी धोक्याबाहेर आहे आणि शस्त्रक्रिया यशस्वी झाली, परंतु ऑपरेशन दरम्यान, डॉक्टरांना आढळले की द्रव नायट्रोजनमुळे, तिच्या पोटात ४.५ सेमीचे मोठे छिद्र तयार झाले आहे. त्यामुळे तिच्या पोटाचा काही भाग कापावा लागला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!