Vinesh Phogat : विनेश तू चॅम्पियन आहेस…!! अपात्र ठरल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खास पोस्ट


Vinesh Phogat : भारताला ऑलिम्पिकमध्ये मोठा धक्का बसला असून भारताचा ऑलिम्पिकपटू विनेश फोगाट हिला अपात्र घोषित करण्यात आले आहे. विनेश फोगाटने तिचं ऑलिम्पिक मेडल गमावलं आहे. महिला कुस्तीच्या ५० किलो वजनी गटातून विनेश काल फायलनमध्ये पोहोचली होती.

कुस्तीपटू विनेश फोगट ही ऑलिम्पिक स्पर्धेत अपात्र ठरली आहे. याच पार्श्वभूमीवर ‘विनेश तू चॅम्पियन आहेस’. असे ट्वीट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वनेशचे सांत्वन केले आहे. दरम्यान, विनेश अपात्र झाल्याने भारताला गोल्ड मेडल मिळवण्याचे स्वप्न भंगले आहे.

त्यामुळे विनेश फोगाटसह संपूर्ण भारतीयांच्या पदरी निराशा पडली आहे. पण, तिने ऑलिम्पिकमध्ये केलेली कामगिरी चमकदार होती. मोदी म्हणाले की, विनेश तू चॅम्पियन आहेत. तू देशाचा अभिमान आणि प्रत्येक देशवासियांसाठी प्रेरणादायी आहेस. आजचा सेटबॅक हा दु:खद आहे.

माझे शब्द, माझ्या मनातील निराशा दाखवू शकणार नाहीत. पण, तू लढवय्यी आहेस, हार न मानणारी आहेस. आव्हानांचा स्वीकार करण्याचा तुझा स्वभाव आहे. तू पुन्हा अधिक ताकदीने पुढे ये. आम्ही सर्व तुझ्यासोबत आहोत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!