Vijay Shivtare : विजय शिवतारे यांची मोठी घोषणा! बारामतीत अपक्ष म्हणून लढणार, अजित पवारांचे टेन्शन वाढले…

Vijay Shivtare : राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी बारामती येथून लोकसभेची निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. मी बारामतीतून अपक्ष निवडणूक लढवणार, असे विजय शिवतारे यांनी स्पष्ट केले आहे.

आज पत्रकार परिषद घेत शिवतारे यांनी याबद्दल माहिती दिली आहे. याबद्दल पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत एकमताने ठराव पास करण्यात आला आहे असेही ते म्हणाले. त्यामुळे बारामती येथील लोकसभेची निवडणुक आता तिरंगी होण्याची चिन्हे आहेत.
यावेळी विजय शिवतारे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली. शिवतारे म्हणाले की, बारामती लोकसभा मतदार संघ हा कोणाचा सातबारा नाही, देशातील ५४३ पैकी एक मतदारसंघ आहे. येथे मालकी कोणाची नाहीये. म्हणून पवार-पवार करण्याएवजी आपण आपला स्वाभीमान जागा करून लढलं पाहिजे असेही शिवतारे म्हणाले.

विशेषतः अजित पवार, २०१९ च्या निवडणुकीत, मी त्यांच्या मुलाच्या विरोधात प्रचार केला होता तो राजकारणाचा भाग आणि माझं कर्तव्य म्हणून केला होता. पण अजित पवारांनी सभ्यतेची नीच पातळी गाठली. मी २३ दिवस लिलावतीमध्ये भरती होतो. मी अॅम्बुलन्समधून सगळा प्रचार केला. त्याला अजित पवारांनी पालखी दौरा असल्याचे सांगितले. Vijay Shivtare

मरायला लागलाय तर कशाला निवडणूक लढवताय…. लोकांच्या सहानुभूतीसाठी तुम्ही खोटं बोलताय… माझ्या गाडीचा नंबर, कोणची-कोणत्या कंपनीची इथंपर्यंत अजित पवार खालच्या थरापर्यंत आले. तु कसा पुढे निवडणून येतो तेच बघतो… महाराष्ट्रात मी कोणाला पाडायचं ठरवलं तर मी कोणाच्या बापाचं ऐकत नाही, मी पाडतो म्हणजे पाडतोच असेही अजित पवार म्हणाले.. राजकारणात एखाद्याला निवडणून आणण्याची प्रवृत्ती असावी… असेही शिवतारे यावेळी म्हणाले.
पुरंदरचे लोक म्हणत आहेत की, आम्हाला बदला घ्यायचा आहे, मी नाही बोलत. नियती बदला घेईल. जेव्हा पवार साहेब (शरद पवार) स्वतः त्यांच्या मुलाबद्दल माझ्या नातवाच्या म्हणण्याला कवडीमोलाची किंमत नाही हे त्या दिवशीच संपले, तुम्हाला घर सोडून जावे लागले, पहाटेचा शपतविधी झाला तेव्हांच तुमची विश्वाहार्यता संपली होती असा टोला देखील शिवतारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लगावाला.