Vidhan Parishad Election 2024 : विधानपरिषदेसाठी भाजपकडून पाच नावे जाहीर, कोणाला मिळाली संधी? जाणून घ्या….
Vidhan Parishad Election 2024 : महाराष्ट्राच्या राजकारणातून एक मोठे वृत्त समोर आले आहे.११ जागांसाठी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपने आपल्या पाच उमेदवारांची यादी जाहीर केली असून या यादीत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या नावाचाही समावेश आहे.
गेल्या 5 वर्षांपासून पंकजा मुंडे यांचा राजकीय वनवास सुरु होता. पंकजा मुंडे यांनी वारंवार आपली उघड नाराजी व्यक्त केली होती. पण लोकसभा निवडणुकीत त्यांना भाजप पक्षाकडून खासदारकीचं तिकीट देण्यात आले आहे.
विधान परिषदेच्या ११ जागांसाठी या महिन्यात निवडणूक होणार आहे. यासाठी भाजपकडून पाच उमेदवारांच्या नावाची घोषणी करण्यात आली आहे. यामध्ये लोकसभा निवडणुकीत बीड मतदारसंघातून निसटता पराभव झालेल्या भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यासह पाच जणांना संधी देण्यात आली आहे. Vidhan Parishad Election 2024
यामध्ये पंकजा मुंडे, परिणय फुके, योगेश टिळेकर, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांना भाजपानं विधान परिषदेसाठी उमेदवारी दिली आहे. भाजपचं विधीमंडळातील संख्याबळ पाहता भाजपाचे ५ उमेदवार विजयी होऊ शकतात.
दरम्यान, या माध्यमातून भाजप पंकजा यांना देशाच्या राजकारणात सक्रीय करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत होती. पण लोकसभेत पराभव झाल्याने पंकजा यांचं काय होणार? याबाबत चर्चा सुरु होत्या. या चर्चांदरम्यान आता पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर उमेदवारी दिली आहे.