पुण्यात महिलादिनी भर रस्त्यावर तरुणाचे स्त्रियांसमोर अश्लील चाळे, नंगानाच करतानाचा व्हिडिओ व्हायरल….


पुणे : आज महिला दिन असल्याने सगळीकडे महिलांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. असे असताना पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरात सातत्याने महिलांवर अत्याचार, गुन्हेगारी आणि हत्येच्या घटना घडताना दिसताय. अशातच पुण्यात नेमकं चाललंय तरी काय? असा संतप्त सवाल राज्यभरातील लोकांकडून केला जात आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी पुण्यात स्वारगेट एसटी डेपो परिसरात एका बसमध्ये तरुणीवर बलात्कार झाल्याच्या घटनेनंतर आता मद्यधुंज अवस्थेतील तरूणाने पुण्यातील शास्त्रीनगर चैकातील सिग्नलवर अश्लील चाळे केल्याचे पाहायला मिळाले. यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. याचा व्हिडिओ देखील पुढे आला आहे.

याबाबत माहिती अशी की, एका तरूणाने सिग्नलवरच स्त्रियांसमोर अश्लील चाळे केल्याचे सांगितले जात आहे. या तरूणाने महागड्या बीएमडब्ल्यू कारमध्ये बसून हे अश्लील कृत्य करत आहे. त्यांनी दारू पिऊन हे कृत्य केल्याचे सांगितले जात आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत.

याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आज आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा केला जात असताना महिलांसमोर केलेल्या या कृत्यानंतर पुन्हा शरमेने मान झुकली असल्याचे दिसतंय. यामुळे पुण्यात नेमकं चाललंय काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याठिकाणी रोज अशा प्रकारच्या घटना घडत आहेत.

ही घटना येरवडा भागांमध्ये शास्त्रीनगर चौकात स्त्रियांच्या समोर तरूणाने हे अश्लील चाळे केले. मोठ्या घरातील हे तरुण असल्याचे दिसून येत आहे. हा तरूण आणि त्याचा मित्र दोघेही मद्यधुंद अवस्थेत कारमध्ये होते. कार देखील रोडवरच लावली असल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.

दरम्यान, अश्लील चाळे करुन झाल्यावर दोघे फुल स्पीडमध्ये गाडी चालवत वाघोलीच्या दिशेने गेल्याची माहिती मिळतेय. तर या कारचा नंबर MH-12 RF8419 असा आहे. या तरुणांचा पोलीस तपास करत आहेत. अशा घटनेने मात्र पुण्याचे नाव खराब होत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!