पुणे रेल्वे स्थानकावरील ‘हा’ व्हिडिओ प्रचंड व्हायरल, व्हिडिओ बघून व्यक्त होतोय संताप..


पुणे : पुणे रेल्वे स्थानकावर पोलीस कर्मचाऱ्याने केलेल्या प्रकाराचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. त्या व्हिडिओला लाखो लोकांनी पाहिले आहे. तसेच यासंदर्भात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

रेल्वे अधिकाऱ्याने या प्रकारासंदर्भात नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत या विडिओमध्ये पुणे रेल्वे स्थानकावर काही प्रवाशी झोपले आहेत. त्या झोपलेल्या प्रवाशांना उठवण्यासाठी पोलीस कर्मचारी त्यांच्या तोंडावर बॉटेलने पाणी टाकत आहे.

रूपेन चौधरी नावाच्या युजरने हा व्हिडिओ ट्विट केला. त्याने ट्विटमध्ये म्हटले की, RIP मानवता. पुणे रेल्वे स्टेशन. असे म्हटले आहे. पुणे रेल्वे स्थानकाच्या डीआरएम इंदू दुबे यांनी या प्रकारसंदर्भात नाराजी व्यक्त केला आहे.

त्या कर्मचाऱ्याला प्रवाशांशी सौजन्याने वागण्याचा सल्ला दिला असल्याचे ट्विटमध्ये दुबे यांनी म्हटले आहे. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. याठिकाणी अनेक प्रवासी झोपले होते.

काही युजरने म्हटले आहे की, सरकारने अधिक वेटींग रुम तयार करावे. यामुळे प्रवाशांना प्लॅटफार्मवर झोपण्याची वेळ येणार नाही. एका युजरने म्हटले आहे की, पोलीस कर्मचाऱ्यास हा प्रकार करण्यापूर्वी लाज वाटली पाहिजे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!