ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक मनोज कुमार यांचं वयाच्या ८७व्या वर्षी निधन! मनोरंजन विश्वावर शोककळा..

मुंबई : अभिनेते आणि चित्रपट दिग्दर्शक मनोज कुमार यांचं वयाच्या ८७ व्या वर्षी कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात निधन झालं आहे. यामुळे मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. मनोज कुमार हे हिंदी चित्रपटांमध्ये देशभक्त अभिनेत्याचा चेहरा म्हणून ओळखले जायचे. अनेक चित्रपट त्यांनी केले असून अनेकांना त्यांचं काम एक प्रेरणा होती.
बॉलिवूडचे सुपरस्टार मनोज कुमार यांनी आपल्या चित्रपटांमधून लोकांना पडद्यावर देशभक्तीची खोल भावना अनुभवायला लावली. तसेच भगतसिंग यांच्यावर या अभिनेत्याचा खूप प्रभाव आहे आणि त्यांनी ‘शहीद’ सारख्या देशभक्तीपर चित्रपटांमध्ये काम केलं आणि अनेकांसाठी प्रेरणास्थान बनले. एकदा ते कामाच्या शोधात एका फिल्म स्टुडिओमध्ये फिरत होते.
त्यांनी त्यांना सांगितलं की ते काम शोधत आहेत. त्यांनी आपले काम परिश्रमपूर्वक केले आणि नंतर त्यांना चित्रपटांमध्ये सहाय्यक म्हणून काम मिळू लागलं.एके दिवशी ते असेच उभा होते आणि त्यांचा चेहरा प्रकाशात इतका आकर्षक दिसत होता की, दिग्दर्शकाने त्यांना एक छोटीशी भूमिका दिली. १९५७ च्या फॅशन चित्रपटात त्यांनी भूमिका साकारली. येथून त्यांचा चित्रपटांमधील प्रवास सुरू झाला.
मनोज कुमार यांनी ‘रोटी कपडा और मकान’, ‘बे-इमान’, ‘कलयुग और रामायण’, ‘अनिता’, ‘आदमी’ यांसारख्या अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. नंतर त्यांनी कधी मागे वळून बघितले नाही.
मनोज कुमार हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक देशभक्तीपर चित्रपटांमध्ये दिसले. मनोज हे भारतातील एकमेव चित्रपट निर्माता असल्याचं म्हटलं जातं ज्यांनी सरकारविरुद्ध खटला जिंकला. यामुळे त्यांनी त्यांच्या आयुष्यात मोठा संघर्ष केला.