महिलांनो नवा ट्रेंड बघाच ! वेलवेट ड्रेस ठरतोय सर्वांची पसंती


उरुळी कांचन :लग्नाच्या मोसमात घागरा-चोळी आणि साडीचा एक वेगळाच दिमाख असतो. पण या वेळी सिल्क आणि नेटची जागा वेलवेटने घेतली आहे. यामुळेच या मोसमात लग्नात फक्त वधूच नव्हे, तर तिच्या करवल्याही निरनिराळ्या रंगातील वेलवेट ड्रेसेसमध्येच दिसून येतील.

एक्सपर्टच्या मते, लग्नाचा प्रत्येक सीझन आपल्यासोबत नवा ट्रेंड आणत असतो. आंतरराष्ट्रीय स्तरावर वेडिंग गाउन्समध्ये दागिन्यांचा वापर होत आहे; तर भारतात भारी जर्दोजी वा कशिदाकारीचे कपडे पसंत केले जात आहेत. गोटचा वापरही यावेळी जास्त दिसत आहे. आता असे कपडे पसंत केले जात आहेत की, जे लग्नानंतरही दुसऱ्या एखाद्या प्रकारे मॅच करून इतर वेळी वापरता येऊ शकतील याचा विचार केला जातो.

रंगांचा बाजार : वेलवेटच्या घागरा- चोळीत पर्पल, एमरल्ड आणि बरगंडी कलर सर्वांत जास्त शोभून दिसत असते. याचप्रमाणे वेलवेट पॅच, फूल आणि कशिदाकारीच्या रूपात कपड्यांवर टाचूनही वापरले जात आहे. विशेष म्हणजे एम्ब्रॉयडरीसोबतच गोटही हाताने टाचलेलेच सुंदर दिसतात. याला वेळ लागतो. पण हाताने टाचलेल्या गोटांचे एक वेगळेच सौंदर्य असते. याची रेंज सुमारे ५ हजार रुपयांपासून सुरू होत असते. यासाठी पुढील वेळी जेव्हा आपण लग्नाला जाल तेव्हा इतरांच्या फॅशनचे अनुकरण करण्याऐवजी स्वतःच वेगळ्या फॉर्ममध्ये राहा. नक्कीच त्यासाठी आपल्याला वेलवेट ड्रेसेस मदत करू शकतो.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!