Vasant More : ब्रेकिंग! वसंत मोरे आता कोणत्या पक्षात जाणार? आतली माहिती आली समोर…


Vasant More : राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. अशाच काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पुण्यातील चेहरा वसंत मोरे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. पुण्यातील मनसेमधील अतंर्गत राजकारणाला कंटाळून आपण राजीनामा देत असल्याचं वसंत मोरे यांनी सांगितले आहे.

आपल्याला डावलंल जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. आपली पुढील राजकीय भूमिका काय असेल, याबाबत २-३ दिवसात कळवणार असल्याचं देखील वसंत मोरे यांनी सांगितले आहे.

वसंत मोरे यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे वसंत मोरे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाटेवर आहेत का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

बारामती मतदारसंघासाठी शरद पवार यांनी नेत्यांच्या जुळजुळवीची तयारी सुरु केली आहे. त्याच रणनितीचा भाग म्हणून वसंत मोरे यांचा शरद पवार गटाला फायदा होऊ शकतो. खडकवासला, पुणे शहराचा काही भाग हा बारामती लोकसभा मतदारसंघात येतो. मनसेमध्ये असताना वसंत मोरे यांच्यावर खडकवासलामध्ये मोर्चे बांधणीची जबाबदारी होती. Vasant More

त्यामुळे लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना वसंत मोरे यांची मोठी मदत मिळू शकते. कारण मागील दोन निवडणुकांमधे खडकवासला मतदारसंघात सुप्रिया सुळे यांना हवं तसं मतदान झालं नव्हतं. तिथे वसंत मोरे यांचा फायदा सुप्रिया सुळे यांना होऊ शकतो.

लोकसभा निवडणुकीतील मदतीच्या बदल्यात विधानसभा निवडणुकीसाठी वसंत मोरे यांना उमेदवारी देण्याचा शब्द शब्द शरद पवार गटाकडून दिला जाऊ शकतो. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने देखील वसंत मोरे यांचे स्वागत करु असे म्हंटले आहे.

दरम्यान, वसंत मोरे यांनी लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छूक असल्याचे म्हंटले आहे. मात्र ते कोणत्या पक्षातून लढणार की अपक्ष निवडणूक लढवणार याबाबत कोणतीही स्पष्टता नाही. त्यामुळे वसंत मोरे नेमका काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!