Vasant More : तात्या आता अपक्ष लढणार? पुण्यात रवींद्र धंगेकरांना उमेदवारी दिल्यावर वसंत मोरेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले….
Vasant More : लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा निवडणूक आयोगाणे जाहीर केली आहे. याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. देशात लोकसभेच्या निवडणुका सात टप्प्यात पार पडणार आहेत. यातील पहिल्या टप्प्याचे मतदान १९ एप्रिलला होणार आहे तर ४ जूनला याचा निकाल लागणार आहे.
तसेच पुणे लोकसभा मतदारसंघ गेल्या काही महिन्यांपासून चर्चेचा विषय ठरला आहे. गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती. मात्र, तिथे पोटनिवडणूक न घेतल्यामुळे आता पुण्यात नेमकं कोण निवडून येणार? यावर पुणेकरांमध्ये चर्चा पाहायला मिळत आहे.
महायुतीकडून एकीकडे भाजपाचे मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी देण्यात आली असताना दुसरीकडे वसंत मोरेंमुळे मविआच्या उमेदवारीबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र, मविआनं पुण्यातून काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर केल्यामुळे आता वसंत मोरेंनी थेट अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. Vasant More
यावेळी वसंत मोरे म्हणाले की पुण्यातील मनसेच्या स्थानिक नेते व पदाधिकाऱ्यांकडून त्रास दिला जात असल्याचं सांगत वसंत मोरे यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी मविआमधून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नही केले.
मात्र, आता मविआकडून काँग्रेसच्या धंगेकरांना अधिकृतपणे उमेदवारी देण्याची घोषणा करण्यात आल्यामुळे आता वसंत मोरे काय करणार? याची उत्सुकता निर्माण झाली आहे. वसंत मोरे यांनी अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचा मानस बोलून दाखवला आहे.
महाविकास आघाडीकडे मी उमेदवारी मागण्यासाठी गेलो नव्हतो. पुण्याची समीकरणं कशी जमू शकतात त्याचा तुम्ही विचार करा हे मी त्यांना सांगू इच्छित होतो. पण मला वाटतं की कदाचित मी थोड्या दिवसांत सांगेन की मनसेच्या पुण्यातल्या कोणत्या नेत्यांनी माझ्या वाटेत पुन्हा एकदा काटे टाकले.
कुणी कुठे बैठका घेतल्या हे सांगेन. मला हे कळत नाही की पक्षात होतो तेव्हाही मला त्रास दिला गेला. पण आता पक्षातून बाहेर पडल्यानंतर उलट जास्त त्रास झाला, असं वसंत मोरे म्हणाले आहेत.