मोठी बातमी! राज ठाकरे यांना मोठा धक्का; लोकसभा निवडणुकीआधी वसंत मोरे यांचा मनसेला राजीनामा


पुणे : पुण्यातील राजकारणात दबदबा असणारे आणि पुणे मनसेचा चेहरा असणारे नेते वसंत मोरे यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली आहे. लोकसभा निवडणुकीआधी राज ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे.

त्यांनी मनसेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. अखेरचा जय महाराष्ट्र साहेब मला माफ करा …, असं म्हणत मनसेला रामराम करत असल्याचं वसंत मोरे यांनी ट्विट करत सांगितलं आहे.

आज सकाळीच वसंत मोरे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता वसंत मोरे यांनी पक्षाला रामराम केला आहे.

सकाळी नाराजीची फेसबुक पोस्ट
एका मर्यादेच्या बाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस खूप शांत होतो… त्यानंतर ना कोणाकडे तक्रार करतो. ना कोणाकडून अपेक्षा ठेवतो, अशी पोस्ट वसंत मोरे यांनी आज सकाळी फेसबुकवर शेअर केली होती. या पोस्टमधून वसंत मोरे नाराज असल्याचं स्पष्ट दिसत होतं. आता अखेर त्यांनी मनसेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!