कोल्हापूरच्या ‘महादेवी’ हत्तीणीसाठी वनतारा विशेष केंद्र उभारणार ; काय असणार वैशिष्ट्ये?

कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नांदणी मठाची महाराणी उर्फ माधुरी हत्तीणी ही चर्चेचा विषय बनली होती. या हत्तीणीला परत आणण्याबाबत काल वनताराचे साईओ विहान कर्णीक आणि नांदणी मठाचे मठाधिपती यांची बैठक पार पडली. या बैठकीत महादेवी हत्तीणीला परत कोल्हापुरात नांदणी मठात पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. आता या महादेवी हत्तीणी साठी वनताराने विशेष केंद्र उभारण्यासाठी पुढाकार घेतला आहे.वनताराने कोल्हापुरातच एक अत्याधुनिक पुनर्वसन केंद्र उभारण्याचा प्रस्ताव दिला आहे. हे केंद्र हायड्रोथेरपी, लेझर थेरपी आणि २४ तास पशुवैद्यकीय सुविधा यांसारख्या अत्याधुनिक सुविधांनी युक्त असेल. यामुळे माधुरीला उत्तम वैद्यकीय सेवा मिळेल आणि कोल्हापूरकरांच्या भावनांचाही आदर राखला जाईल.
नांदनी मठाची महाराणी महादेवीच्या आरोग्याबद्दल आणि तिच्या काळजीबद्दल अनेक चर्चा सुरू होत्या. वनताराने या प्रकरणात लोकभावना, मठाचे नेतृत्व आणि प्राणी कल्याण या तिन्ही गोष्टींचा आदर करत एक अनोखा तोडगा काढला आहे. या प्रस्तावानुसार, नांदणी परिसरात हे केंद्र उभारले जाण्याची शक्यता आहे, जेणेकरून महादेवीला कोल्हापूरपासून दूर जावे लागणार नाही. विशेष म्हणजे हे केंद्र आधुनिक सुविधांनी युक्त असणार आहे. वनताराने प्रस्तावित केलेल्या या केंद्रात महादेवीसाठी सर्व अत्याधुनिक आणि वैज्ञानिक सुविधा असतील. ज्यामुळे तिला उत्तम दर्जाची वैद्यकीय सेवा मिळेल.
केंद्राची प्रमुख वैशिष्ट्ये काय?
हायड्रोथेरपी तलाव आणि पोहण्यासाठी जागा
संधिवात आणि पायांच्या इतर आजारांवर उपचार करण्यासाठी उपयुक्त
लेझर थेरपीसाठी खास कक्ष
वेदना कमी करण्यासाठी आणि उपचारांसाठी विशेष व्यवस्था.
२४x७ पशुवैद्यकीय सुविधा: २४ तास तज्ज्ञ डॉक्टर आणि कर्मचारी उपलब्ध असतील.
मुक्त निवासस्थान: महादेवीला सुरक्षित आणि नैसर्गिक वातावरणात मुक्तपणे फिरता येईल.
मऊ गादीसारखी रबरयुक्त जमीन आणि सॉफ्ट सँड माऊंड्स: यामुळे पायांच्या आजारांवर आराम मिळेल आणि चालणे सोपे होईल.