Vanraj Andekar : वनराज आंदेकर प्रकरणात आता ८ पिस्तुलांसह १३ काडतुसे जप्त, अजून दोघे अटकेत…
Vanraj Andekar : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची पिस्तूलाने गोळीबार व कोयत्याने हल्ला करत खून केला होता. या प्रकरणी बहीण व जावयाला अटक करण्यात आली आहे. तब्बल १५ जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणी आता मोठी अपडेट समोर आली आहे. पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्या प्रकरणातील पळून गेलेल्या दोघांना गुन्हे शाखेने अटक केल्याची माहिती समोर आली आहे.
वनराज आंदेकर यांच्या हत्या प्रकरणात आतापर्यंत तीन अल्पवयीनांसह २१ जणांना अटक केली आहे. आरोपींकडून आठ पिस्तूल, १३ काडतुसे, सात दुचाकी, मोटार देखील जप्त केली आहे.
वनराज आंदेकर हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार सोमनाथ गायकवाड, शुभम दहिभाते, आंदेकर यांची बहीण संजीवनी कोमकर, तिचा पती, दीर, भाचा यांच्यासह इतरांना अटक करण्यात आलेली आहे.
त्याचबरोबर हत्या करण्यासाठी कोयते, पिस्तूल पुरविणारा आरोपी संगम वाघमारे याला देखील अटक झाली आहे. त्यानंतर आता या घटनेनंतर पसार झालेला आरोपी सागर पवार, साहिल दळवी यांना गुन्हे शाखेच्या युनिट एकने आणि खंडणी विरोधी पथकाने काल (बुधवारी) रात्री उशीरा अटक केली आहे. Vanraj Andekar
त्याचबरोबर वनराज आंदेकर हत्या प्रकरणात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेला शिवम आंदेकर याच्या जीवाला धोका असल्याचं लक्षात घेऊन त्याला पोलीसांकडून संरक्षण देण्यात आले आहे.
रविवारी( ता.१) वनराज आंदेकर यांच्यावर नाना पेठ परिसरातील त्यांच्या घराजवळ पिस्तुलातून गोळ्या घालण्यात आल्या, त्याचबरोबर कोयत्याने २४ वार करण्यात आले या घटनेत त्यांचा मृत्यू झाला. त्यावेळी शिवम वनराज आंदेकर यांच्यासोबत होता. हल्लेखोरांनी त्यालाही मारण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, थोडक्यात त्याचा जीव वाचला.