वंदे भारत ट्रेन आणखी सुपरफास्ट ! मुंबई- सोलापूर व मुंबई- शिर्डी ट्रेनने महिन्यातच केला एक लाख प्रवासी टप्पा पार !!
मुंबई : सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस आणि मुंबई – साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसने ३२ दिवसांच्या कालावधीत १,००,२५९ प्रवाशांची वाहतूक केली आहे या गाड्यांच्या प्रचंड लोकप्रियतेमुळे रु.८.६० कोटींची महसूल जमा झाला आहे.
मुंबई – सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, कल्याण, पुणे आणि कुर्डुवाडी येथील २६,०२८ प्रवासी संख्येतून रु.२.०७ कोटी महसूलाची नोंद केली. तर सोलापूर – मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसने सोलापूर, कुर्डूवाडी आणि पुणे येथील २७,५२० प्रवासी संख्येतून रु.२.२३ कोटींचा महसूल नोंदविला आहे.
मुंबई – साईनगर शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेसने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, ठाणे आणि नाशिक रोड येथील २३,२९६ प्रवाशांच्या संख्येतून २.०५ कोटी रुपयांची महसूलाची नोंद केली.
साईनगर शिर्डी – मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसने साईनगर शिर्डी आणि नाशिकरोड येथून २३,४१५ प्रवाशांच्या संख्येतून रु.२.२५ कोटी महसूलाची नोंद केली.
वंदे भारत ट्रेनमध्ये ऑन-बोर्ड वाय-फाय इन्फोटेनमेंट, GPS आधारित प्रवासी माहिती प्रणाली, प्लश इंटिरियर्स, टच फ्री सुविधांसह बायो-व्हॅक्यूम टॉयलेट्स, डिफ्यूज्ड एलईडी लाइटिंग, प्रत्येक सीटच्या खाली चार्जिंग पॉइंट्स, वैयक्तिक टच-आधारित वाचन दिवे आणि लपविलेले रोलर पट्ट्या यासारख्या उत्कृष्ट प्रवासी सुविधा आहेत. जंतूमुक्त हवेच्या पुरवठ्यासाठी यात अतिनील दिव्यासह उत्तम उष्णता वायुवीजन आणि वातानुकूलित यंत्रणा आहे. इंटेलिजेंट एअर कंडिशनिंग सिस्टीम हवामानाच्या परिस्थितीनुसार/ उपलब्ध संख्येनुसार कूलिंग समायोजित करते.
वंदे भारत ट्रेनला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि. १० फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून हिरवा झेंडा दाखवला होता. मुंबई – सोलापूर- मुंबई वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील ९वी वंदे भारत ट्रेन आहे आणि मुंबई – साईनगर शिर्डी – मुंबई वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील १०वी वंदे भारत ट्रेन आहे.
या गाड्यांच्या अभूतपूर्व यशामुळे रेल्वेने आपल्या प्रवाशांना आधुनिक, आरामदायी आणि हाय-स्पीड वाहतूक उपलब्ध करून दिली आहे.