Vande Bharat Express Train : आता प्रवास होणार अजून सुसाट! राज्याला मिळणार आणखी ३ वंदे भारत एक्स्प्रेस? २ मुंबईहून, १ पुण्यातून धावणार

Vande Bharat Express Train : आताच्या घडीला देशभरात ३४ वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनची सेवा सुरू झाली असून, आणखी ९ मार्गांवर वंदे भारत ट्रेन सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आहे. आताच्या घडीला देशभरात ३४ वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनची सेवा सुरू झाली असून, आणखी ९ मार्गांवर वंदे भारत ट्रेन सुरू करण्यात येणार आहेत.
दिवाळीच्या दरम्यान ९ नवीन वंदे भारत एक्स्प्रेसचे लोकार्पण केले जाऊ शकते, असे म्हटले जात आहे. यात महाराष्ट्राला आणखी ३ ट्रेन मिळू शकतात. यातील दोन मुंबईतून तर एक पुण्यातून सुरू होऊ शकते. Vande Bharat Express Train
२०१९ मध्ये पहिली वंदे भारत एक्सप्रेस दिल्ली ते वाराणसी मार्गावर धावली. शताब्दी ट्रेनच्या मार्गावर वंदे भारत ट्रेन चालवल्या जात आहेत. आता स्लीपर वंदे भारत ट्रेन सुरू होणार आहे. तसेच सर्वसामान्यांसाठी वंदे मेट्रो आणि साधारण वंदे भारत ट्रेनची योजना आहे. देशभरात या ट्रेन चालवल्या जाणार आहेत.
मुंबई-गोवा, मुंबई-साईनगर शिर्डी, मुंबई-सोलापूर दरम्यान वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहे. मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस पुण्यावरुन जाते. परंतु आतापर्यंत पुण्याहून सुटणारी एकही वंदे भारत एक्स्प्रेस नाही. आता पुणे ते सिकंदराबाद अशी थेट धावणारी वंदे भारत एक्स्प्रेस सुरु होण्याची शक्यता आहे.
देशभरात दिवाळीत नऊ वंदे भारत एक्स्प्रेस सुरु होणार आहे. त्यात पुणे ते सिंकदराबाद वंदे भारत एक्स्प्रेसचा समावेश आहे, असे म्हटले जात आहे. याशिवाय, मुंबई ते कोल्हापूर आणि मुंबई ते जालना या मार्गांवरही वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, दिवाळीत देशात ९ वंदे भारत एक्स्प्रेस सुरु होणार आहे. त्यातील ३ वंदे भारत एक्स्प्रेस मध्य रेल्वे विभागात चालवण्यात येणार आहे. दुसरीकडे, इंदोर-भोपाळ या मार्गावर चालवण्यात येणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला प्रवाशांचा अगदीच अत्यल्प प्रतिसाद मिळत होता. या पार्श्वभूमीवर आता ही वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनचा सेवा विस्तार नागपूरपर्यंत करण्यात आला आहे.