मोठी बातमी! वाल्मिक कराडवर मोक्का लागताच धनंजय मुंडे यांनी घेतली कराडच्या कुटूंबाची भेट, भेटीचे नेमकं कारण काय?

बीड : येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी वाल्मिक कराडवर काल मोक्का लावण्यात आला. यानंतर काल परळीत कराडच्या समर्थनार्थ कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी जोरदार राडा करत परळी बंदची हाक दिली आहे.
अशातच आता राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराडच्या कुटुंबियाची भेट घेतली असल्याची माहिती समोर आली आहे. आज पहाटे ही भेट झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच वाल्मिक कराडला राजकीय पाठबळ असून धनंजय मुंडे यांचा तो निकटवर्तीय असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे. आता, धनंजय मुंडे यांनी कराड कुटुंबाची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे.
राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी पहाटे कराड कुटुंबाची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईवरून परळी मध्ये आल्यानंतर धनंजय मुंडे हे कराड कुटुंबीयांच्या घरी दाखल झाले. मुंडे यांनी वाल्मिक कराड यांच्या आई आणि पत्नीची विचारपूस केल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळली आहे.
या भेटीला अधिकृत दुजोरा मिळत नसला तरी भेट घेतल्याची परळीमध्ये चर्चा आहे. काल आंदोलनादरम्यान वाल्मिक कराड याच्या आई पारूबाई यांना भोवळ आली होती. तब्बल दहा तासापेक्षा जास्त कराड कुटुंब पोलीस स्टेशन समोर ठिय्या आंदोलनात बसून होते.