मोठी बातमी! वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाणला ठोकल्या बेड्या, नेपाळ बॉर्डरवरुन पोलिसांनी उचलला…

पुणे : वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाण हा गेल्या 10 दिवसांपासून फरार होता. निलेश चव्हाणच्या शोधासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांची चार पथकं तर पुणे पोलिसांची तीन पथकं राज्यात आणि देशातील इतर राज्यांमध्येही शोध घेत होते. अखेर पिंपरी चिंचवड पोलिसांना निलेश चव्हाण याला ताब्यात घेण्यात यश आले आहे.
वैष्णवी हगवणेला आत्महत्येला प्रवृत्त केल्याबद्दल हगवणे कुटुंबियांसह निलेश चव्हाणला बावधन पोलिसांनी सहआरोपी केले होते. तर पुणे पोलिसांच्या वारजे पोलिसांनी त्याला वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याबद्दल त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. निलशे चव्हाण हा वैष्णवीची नणंद असलेल्या करिष्मा हगवणेचा मित्र आहे.
त्याच्याबद्दल अनेक धक्कादायक माहिती समोर येत होती. पुणे -वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाण हा अटक होण्याआधीच तो फरार झाला. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या शोधासाठी हालचाली सुरु केल्या होत्या. आता महत्वाची माहिती त्याच्याकडून उघड होणार आहे. लवकरच त्याला पुण्यात आणले जाणार आहे.
त्याला देशाबाहेर पलायन करण्यापासून रोखण्यासाठी लुक आऊट नोटीस जारी करण्यात आली होती. पिंपरी चिंचवड पोलिसांनी निलेश चव्हाणच्या शोधासाठी विशेष पथकांची स्थापना केली होती. या पथकांकडून विविध ठिकाणी तपास केला जात होता.
दरम्यान, 10 दिवसानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. नेपाळ बॉर्डरवरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी त्याच्यावर बावधन पोलिसांत गुन्हा आहे. तो 21 मे पासून फरार होता. त्याने अनेक कारनामे केले असल्याचे चौकशीत समोर आले होते. यामुळे आता तो अडकणार आहे.