Vaishali Nagwade : वैशाली नागवडे यांच्या फेसबुक पोस्टमुळे खळबळ! दौंड तालुक्यात चर्चेला उधाण…
Vaishali Nagwade पुणे : विधानसभा निवडणुकीच्या अर्ज माघारी घेण्याच्या अगोदरच दौंड तालुक्यात विविध राजकीय नाट्यमय परिस्थिती पाहायला मिळत आहे. महायुती मधून भाजपचे आमदार राहुल कुल यांना भाजप तर्फे उमेदवारी देण्यात आले आहे.
तर दुसरीकडे महायुतीमध्ये महायुतीमधीलच मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने माजी जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे यांना पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म देत महायुतीतच गडबड करून ठेवली आहे.
दुसरीकडे अजित पवार यांची साथ सोडत अजित पवार यांचे निकटवर्तीय समजले जाणारे रमेश थोरात यांनी तुतारी हाती घेतली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर अजित पवार गटाच्या महिला नेत्या वैशाली नागवडे यांनी फेसबुक पोस्ट करत अजित पवारांच्या जीवावर राजकारणात दौंड तालुक्यात सगळ्यात जास्त पदे कोणी मिळवली असे म्हणत त्यांनी महायुती आणि महाविकास आघाडी मध्ये खळबळ उडून दिली आहे. Vaishali Nagwade
वैशाली नागवडे यांचा नेमका रोख कोणाकडे आहे याची जोरदार चर्चा दौंड तालुक्यात सुरू झाली आहे महायुतीचे घटक पक्ष असलेले अजित पवार समर्थक वीरधवल जगदाळे यांचा ऐनवेळी आलेला उमेदवार अर्ज आणि रमेश थोरात यांनी तुतारी कडून मिळवलेली उमेदवारी या सर्व गोष्टींचा राजकीय ट्विस्ट दौंडच्या राजकारणात असतानाच वैशाली नागवडे यांच्या या पोस्टमुळे दौंड चे राजकारण आणखीनच तापले आहे.