Uttarkashi Tunnel Rescue : उत्तराखंडमधील रेस्क्यू ऑपरेशन अंतिम टप्प्यात, १७ दिवसांनी ४१ कामगार येणार बोगद्यातून बाहेर..
Uttarkashi Tunnel Rescue : उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथील सिल्कियारा बोगद्यातून ४१ कामगारांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गेल्या १७ दिवसांपासून हे कामगार बोगद्यात अडकले असल्याने त्यांच्या प्रकृतीबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे.आता इथं बोगद्यात अडकलेल्या मजुरांची अखेर सुटका होत आहे. रेस्क्यू ऑपरेशनचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे.
गेल्या १२ नोव्हेंबरपासून म्हणजेच १७ दिवसांपासून तब्बल ४१ मजूर बोगद्यात अडकून पडले होते. तेव्हापासून या मजुरांच्या सुटकेसाठी दिवसरात्र रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. Uttarkashi Tunnel Rescue
उत्तरकाशीतील सिल्क्यारा बोगद्यात ४१ कामगार अडकल्याने देशासह जगाच्या नजरा या रेस्क्यू ऑपरेशनकडे लागल्या. ४१ मजुरांना बाहेर काढल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात येईल. त्यासाठी रुग्णवाहिका पाठवण्यात आल्या आहेत. ४१ मजुरांसाठी ४१ बेड तयार करण्यात आले.
बोगद्यात मॅन्युअल ड्रिलिंग करत असलेल्या रैट माइनर्स कामगारांनी मोठ्या प्रमाणात उत्खनन केले आहे, ते आत अडकलेल्या कामगारांपासून फक्त ३ मीटर दूर आहेत. पाच वाजेपर्यंत सर्वांना बाहेर काढता येईल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
सिल्क्यरा बोगद्याच्या बाहेर डॉक्टरांच्या टीमसह ४१ रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत, जेणेकरून कामगार बाहेर येताच त्यांना आवश्यकतेनुसार उपचार करता येतील. एनडीआरएफची टीमही स्टँडबायवर आहे.
लवकरच चांगली बातमी येणार असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. बोगद्यात पाईप टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. सर्व ४१ मजुरांना लवकरात लवकर बाहेर काढले जाईल. उत्तरकाशीमध्ये सिल्क्यरा बोगद्यात ४१ मजूर गेल्या १७ दिवसांपासून अडकले आहेत.
पाऊस आणि थंडी असतानाही खोदकाम वेगाने सुरू आहे. मॅन्युअल ड्रिलिंगसाठी तीन टीम कार्यरत आहेत. गेल्या १७ दिवसांपासून बोगद्यात अडकलेल्या कामगारांना पाईपद्वारे अन्न आणि पाणी पुरवठा केला जात आहे.
याशिवाय वॉकी टॉकीच्या माध्यमातून त्यांच्याशी सातत्याने बोलणे सुरू आहे. त्यांना बोगद्यातून बाहेर काढण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू होते. घटनास्थळी डॉक्टरांची टीमही सज्ज आहे. बोगद्याच्या तोंडावर रुग्णवाहिका सज्ज आहेत.