Uttarkashi Tunnel Rescue : बोगद्यात अडकलेल्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्याचे काम अंतिम टप्प्यात, आता बोगद्याची भिंत हातोड्याने तोडणार, अजूनही भयावह स्थिती…

Uttarkashi Tunnel Rescue : उत्तरकाशी बोगद्यात अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठीचे मदतकार्य अंतिम टप्प्यात आले असून आत अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यास यश येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मात्र, एकाही मजुराला बाहेर काढण्याचा मार्ग अद्याप निश्चित झालेला नाही. ड्रिलिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या यूएस निर्मित ऑगर मशीनच्या मार्गात वारंवार येणाऱ्या अडथळ्यांमुळे, ऑपरेशनमध्ये गुंतलेले एनडीआरएफचे जवान आता पारंपारिक पद्धतीने हाताने ड्रिलिंग करण्याच्या पर्यायावर विचार करत आहेत. अशी माहिती एका अधिकाऱ्यांनी दिली आहे. Uttarkashi Tunnel Rescue
ड्रिलिंगच्या मार्गात वारंवार येणाऱ्या अडथळ्यांमुळे आता एनडीआरएफचे जवान स्वतःहून कामगारांच्या जवळ आणलेल्या पाइपलाइनमध्ये उतरतील, असे सूत्रांनी सांगितले. ४७ मीटर खोदकाम पूर्ण झाले आहे. आणखी १० मीटर ड्रिलिंग करावे लागेल.

तसेच यासाठी, बचाव कार्यात गुंतलेल्या एजन्सीचे कर्मचारी ड्रिलिंगसाठी वापरल्या जाणार्या हातोडा, सेबल, गॅस कटर मशीन आणि सामान्य साधने यांसारख्या पारंपरिक साधनांसह उतरतील. पाईपच्या मार्गात येणारा अडथळा ते हाताने दूर करतील. हे खूप कठीण काम असेल आणि खूप वेळ लागेल. मात्र, यात यशाची आशा आहे.
कामगारांना वाचवण्यासाठी शुक्रवारी रात्री बोगद्याच्या कोसळलेल्या भागात खोदकाम पुन्हा थांबवावे लागले आणि बचाव प्रयत्नांना आणखी एक धक्का बसला. एका अधिकाऱ्याने सांगितले की, शुक्रवारी ड्रिलिंग पुन्हा सुरू झाल्यानंतर काही वेळाने ऑगर मशीनला काही धातूच्या वस्तूमुळे ड्रिल करता आले नाही, त्यामुळे काम थांबवावे लागले. याच्या एक दिवस आधी ऑजर मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने अधिकाऱ्यांना बचावकार्य थांबवावे लागले होते.
दरम्यान, सततच्या अडथळ्यांमुळे औगर मशिनने ड्रिलिंग आणि ढिगाऱ्यांमध्ये स्टील पाईप टाकण्याचे काम सुरू नसल्याचे त्यांनी सांगितले. अशा परिस्थितीत मॅन्युअल ड्रिलिंगचा विचार केला जात असला तरी त्यासाठी जास्त वेळ लागतो, असे या अधिकाऱ्याने सांगितले आहे.