उरुळीकांचन पोलिस ठाण्याला अखेर उद्घाटक मिळाले! उद्या अजित पवार यांच्या हस्ते पोलिस ठाण्याचे उद्घाटन…!!


उरुळी कांचन : पुणे पोलिस आयुक्तालयातून वगळून नवीन स्वतंत्र पोलिस ग्रामीण ठाण्याची मान्यता मिळालेल्या उरुळीकांचन या नवीन पोलिस ठाण्याचे उद्घाटन शासन मान्यता मिळुन तब्बल १४ महिन्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शनिवार (दि.२०) रोजी होणार असल्याची माहिती अप्पर पोलिस अधिक्षक आनंद भोईटे यांनी दिली आहे.

दरम्यान पुणे पोलिस आयुक्त कार्यालयात पावणे तीन वर्ष सामाविष्ठ झालेल्या या भागाला पुन्हा ग्रामीण अधिक्षक कार्यालयात सामाविष्ठ केल्याने या संपूर्ण दहा गावांच्या पोलिस कार्यक्षेत्राला अधिकारी व कर्मचाऱ्यांसह तब्बल ३५ जणांचे अतिरिक्त पोलिस बळ मिळणार आहे. पुणे पोलिस आयुक्तालयात २३ मार्च २०२१ रोजी समाविष्ठ झालेल्या लोणीकाळभोर पोलिस ठाण्याचे विभाजन करुन उरुळीकांचन पोलिस ठाण्याची निर्मिती झाली आहे.

राज्य शासनाच्या गृह विभागाने ५ ऑक्टोबर २०२३ रोजी उरुळीकांचन या पुणे ग्रामीण अधिक्षक कार्यालयातील पोलिस ठाण्याला मंजुरी दिली आहे. पोलिस ठाण्यासाठी ८ कोटी खर्चाची मान्यता व १०० पोलिस बळाची अस्थापणा मंजुर करण्यात आली आहे. जिह्यात महाविकास आघाडी सरकारच्या काळात पुणे अधिक्षक अंतर्गत पारगाव, उरुळीकांचन, माळेगाव, सुपा, निरा नृसिंहपूर अशा पाच पोलिस ठाण्यांना मंजुरी दिली होती. प्रत्यक्षात पारगाव , सुपा ही पोलिस ठाणे तात्काळ सुरू करण्यात आली. तर माळेगाव पोलिस ठाणे महायुती सरकारच्या काळात सुरू करण्यात आले होते.

परंतु उरुळीकांचन पोलिस ठाण्याबाबत सक्षम पाठपुरावा न झाल्याने हे पोलिस ठाणे तब्बल १४ महिने अस्थापणा सुरू होण्याच्या प्रतिक्षेत राहिले. दुसरीकडे पुणे पोलिस आयुक्तालयातील हद्द कमी होत असल्याने पुणे पोलिस आयुक्तालयातून हा भाग पूर्वीप्रमाणे शहर हद्दीत असवा अशी मागणी पडद्याआड सुरू होती.

एकिकडे पुणे पोलिस आयुक्तालयात हा भाग कायम रहावा म्हणून प्रयत्न सुरू होते. तर दुसरीकडे शहर आयुक्तालय या भागाकडे अधिक पोलिस संख्याबळ उपलब्ध करुन देत नव्हते तसेच गुन्हांची संख्या घटत नसल्याची आवस्था ,वाहतुक कोंडी ची समस्या, वाहतूक पोलिसांकडून शेतकऱ्यांवर वाहतूक शिस्त पाळण्याचे बंधन व ग्रामीण भागातील शेतकऱ्यांवर होत असलेली कारवाई , चोरींची फोफावली संख्या, गुन्हे उघड करण्याची पोलिसांची नसलेली मानसिकता, शहर पोलिसांच्या विविध अस्थापणांकडून होणारी वसुली आदी कारणांनी या भागात कायम शहर पोलिसांवर नागरीकांची नाराजी उमटत होती. गेल्या चौदा महिन्यांपूर्वी या पोलिस ठाण्याला मंजुरी मिळून ही अस्थापणा सुरू होऊ शकली नाही, दिवाळी सणानंतर फक्त उद्घाटना अभावी ही अस्थापणा प्रलंबित राहिली होती.

शुक्रवारी( दि.१९) बारामती चे अप्पर पोलिस अधिक्षक आनंद भोईटे यांनी उद्या शनिवार (दि. २०) जानेवारी रोजी दुपारी चार वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या होणार असल्याची माहिती पत्रकारांना दिली. दरम्यान या पोलीस ठाण्याला सध्या एक वरिष्ठ पोलिस निरीक्षक ,दोन उपनिरीक्षक यांच्यासह ३२ पोलीस कर्मचारी असे एकूण ३५ कर्मचारी मनुष्यबळ मंजूर करून दिले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!