अभ्यास करत नाही म्हणून आई रागवली ; आईचा गळा दाबून मुलानेच केला खून ; उरुळी कांचन च्या खूनाचा उलगडा…!


उरुळी कांचन : अभ्यास करताना मोबाईल पहात असलेल्या मुलाला रागविल्याने १२ वीत शिकणार्‍या मुलाने आईला भिंतीवर ढकलून देऊन गळा दाबून तिचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ही घटना उरुळी कांचन येथील माऊली कृपा इमारतीत घडली आहे.

तस्लीम शेख हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती लोणी काळभोर पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी शवविच्छेदनासाठी मृतदेह ससून रुग्णालयात पाठविला आहे.

त्यात गळा दाबून व डोक्याला जखम झाल्याने मृत्यु झाल्याचा प्राथमिक अहवाल डॉक्टरांनी दिला. जेव्हा वडिल जमीर आणि मुलगा जिशान हे दोघेच तेथे होते. त्यांच्याकडे स्वतंत्र चौकशी केल्यावर मुलाने घडलेली घटना सांगितली. यामुळे घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, मुलगा जिशान हा बारावीला आहे. तो अभ्यास करीत असताना मोबाईलवर पहात बसला होता. ते पाहून त्याची आई तस्लीम चिडली व ती जिशानला रागविली. त्याच्या गालावर चापट मारली. त्यामुळे जिशान याने आपल्या आईला जोरात भिंतीवर ढकलले व तिचा गळा दाबला. यात त्यांचा मृत्यू झाला आहे.

त्याने आईने आत्महत्या केली असे म्हटले व मृतदेह लटकून ठेवला. आता पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक काळे तपास करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!