Uruli Kanchan : बेल्हा ते पाबळ राज्य मार्गावर शिंदवणेत नकाशातील रस्त्यासाठी उपोषण! सार्वजनिक बांधकाम व पुरंदर उपसा योजनेच्या विभागांत हक्कवादात रस्ता रखडला..!!


Uruli Kanchan  उरुळी कांचन : बेल्हा ते पाबळ (क्र.११७) या राज्य शासनाकडून नुकत्याच हायब्रीड अँन्युईटी या तत्वावर विकसित केलेल्या राज्य मार्गावर शिंदवणे ग्रामपंचायत हद्दीतील ७०० मीटर राज्यमार्गाच्या अखत्यारीत असलेल्या रस्त्याच्या कामासाठी शिंदवणेचे माजी सरपंच व विद्यमान सदस्य गणेश महाडिक यांनी सलग चौथ्या दिवशी उपोषण सुरू ठेवले आहे.

राज्य मार्गाच्या अखत्यारीत नसतानाही वळती (ता.हवेली ) फाट्याला वळसा घालून पुढे राज्य मार्गाला जोडणाऱ्या धोकादायक मार्गाऐवजी सरळ नकाशा त दर्शविणाऱ्या व राज्य मार्गाच्या स्वतः च्या हद्दीतील रस्त्याचे प्राधान्याने पूर्ण करावे या मागणीसाठी सुरू असलेले उपोषणावर चौथ्या दिवशी तोडगा निघत नसल्याची स्थिती आहे. Uruli Kanchan

राज्य शासनाने २०१८ साली पूर्वीपासून  दुर्लक्षित असलेल्या बेल्हा ते पाबळ या राज्यमार्गासाठी २८७ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. या भागाचे तत्कालीन आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या माध्यमातून या रस्त्याला हायब्रीड अँन्युईटी या योजनेत सामाविष्ठ करुन या रस्त्याला १० मीटरचे रुंदीकरण करुन शिरुर व हवेली या तालुक्यांना जोडण्यात आला आहे.

हा मार्ग जेजुरी -उरुळीकांचन – तळेगाव ढमढेरे -शिक्रापूर मार्गे पाबळला प्रस्तावित करुन उच्च प्रतिचा तयार करण्यात आला आहे. या मार्यावर शिंदवणे घाटात या सुधारीत मार्गात मोठ्या प्रमाणात कामे करण्यात आली आहे. दरम्यान हा मार्ग शिंदवणे ते उरुळी कांचन पर्यंत राज्य मार्गाच्या अखत्यारीत आहे. मात्र या मार्गात शिंदवणे हद्दीत वळती फाट्यावरून नकाशात नसलेला परंतु पूर्वीपार रस्ता विकसित करण्यात आला आहे.

वास्तविक हा मार्ग राज्य मार्गाच्या अखत्यारीतून आखणीप्रमाणे सुधारीत करणे क्रमप्राप्त असताना हा रस्ता पिळाची वळणे घेऊन तयार झाल्याने या ठिकाणी मोठे अपघात घडत आहे. या राज्य मार्गाला शिंदवणे हद्दीत आखणीप्रमाणे सरळ रुप द्यावे म्हणून अनेक वर्षांची मागणी आहे. निधीचे अंदाजपत्रक तयार करुन या जागेवर पुरंदर उपसा सिंचन योजनेने हक्क दाखविल्याने हा सरळ आखणी असलेला ७०० मीटरचा मार्ग धुळखात पडून आहे.

तसेच पुरंदर उपसा योजनेने या ठिकाणी अंडरग्राऊंड २.२ व्यासाची पाईप लाईनचे काम केल्याने हा रस्ता परस्पर परवानगीमुळे भिजत पडला आहे. त्यामुळे रस्त्याचे काम मार्गी लागत नसल्याने शिंदवणेचे माजी सरपंच व ग्रामपंचायत  सदस्य गणेश महाडीक यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व पुरंदर उपसा सिंचन यांच्या विवादात हा रस्ता मार्गी लागत नसल्याने उपोषणास सुरुवात केली आहे.

दरम्यान उपोषणाला सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता एस.एस. भालशेटवार तसेच पुरंदर उपसा योजनेचे उप अभियंता धुमाळ व हंकारे यांनी उपोषण स्थळी भेट घेऊन त्यांच्याकडून जागेच्या हक्कासंदर्भात लेखी स्वरूपाचे अश्वासन मिळत नसल्याने उपोषण चौथ्या दिवशी सुरू आहे.

 ” शिंदवणेतील मूळ आखणीतील रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने काम हाती घेतले आहे. मात्र पुरंदर उपसा योजनेने हे करण्यास मनाई घातली आहे. याबाबत आम्ही पुरंदर उपसा योजना तसेच कृष्णा खोरे मंडळाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे एनओसी मिळण्यासाठी प्रयत्नशील आहोत, मात्र एनओसी मिळत नसल्याने काम प्रलंबित आहे. एनओसी मिळाल्यास काँक्रेंट क्रेसिंग किंवा पूलाचा पर्याय करुन रस्त्याचा काम पूर्ण होऊ शकते ”

-प्रदिप लवटे , अतिरिक्त कनिष्ठ अभियंता,सार्वजनिक बांधकाम विभाग.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!