Uruli Kanchan : उरुळी कांचनमध्ये संत तुकाराम पालखी मार्ग बदलावरुन प्रचंड गोंधळ! ग्रामस्थ व विश्वस्त यांच्या वादातून ग्रामस्थांनी नगारा रथ अडवला…!!
जयदिप जाधव
Uruli Kanchan उरुळीकांचन : जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात पालखी सोहळा विश्वस्तांनी पालखी नियोजन सोहळ्यात केलेल्या बदलांनी उरुळीकांचन (ता.हवेली ) येथील पारंपारीक पध्दतीने पालखी सोहळा न करण्याचा भूमिकेने संताप ग्रामस्थांनी पालखी सोहळ्याचा रथापुढील काढण्यास आयोजन न झाल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी नगारा बैलगाडा आडविण्याचा प्रयत्न केला. यावेळी संतप्त ग्रामस्थांची पालखी विश्वस्त व पोलिसांत मोठी वादावादी घडून विश्वस्तांच्या निषेधाची घोषणाबाजी झाली आहे.
लोणीकाळभोरचा मुक्काम उरकून उरुळीकांचन येथे संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याची विसाव्याची परंपरा आहे.मात्र पालखी सोहळा विश्वस्तांनी पालखीसोहळ्यात यंदाच्या वर्षी पालखी सोहळ्यात बदल करुन गावाला प्रदक्षिणा घालून ग्रामदैवत हनुमान मंदिरात पालखी पादुका दर्शनास ठेवण्याची परंपरा आहे. या वर्षी मात्र सोहळा विश्वस्तांनी पालखी सोहळ्यात बदल करुन पालखी सोहळ्याचे नियोजन महात्मा गांधी विद्यालयात केले होते. या नियोजनास ग्रामस्थांचा विरोध होता. असे असताना बुधवार( दि.३) रोजी पालखी सोहळा उरुळीकांचन गावात प्रवेश केल्यानंतर ग्रामस्थांनी पुणे-सोलापूर महामार्गावर पालखी सोहळा पारंपारिक रिवाजाने गावाला प्रदक्षिना घालून मार्गस्थ करावा अशी मागणी केली.मात्र त्याला विश्वस्तांनी विरोध केल्याने ग्रामस्थांनी नगारा रथ आडवून धरला. Uruli Kanchan
या प्रकारानंतर ग्रामस्थांची पोलिस प्रशासन व विश्वस्तांशी वादावादी होऊन विश्वस्तांनी नगारा बैलगाड्याचे बैल सोडून विरोध दर्शविला. या वादानंतर पोलिसांनी पालखी सोहळा हॉटेल एलाईट चौकातून काढून पुढे मार्गस्थ केला. त्यानंतर पालखी विश्वस्तांनी पालखी सोहळा विसावा न घेता यवत मुक्कामी दिशेने रवाना केला. दरम्यान या प्रकाराने मोठा गोंधळ उडाला आहे. ग्रामीण पोलिस अधिक्षक पंकज देशमुख यांच्यासमोरच पोलिसांची वादावादी उडाली आहे. ग्रामस्थांनी विश्वस्तांच्या निर्णयावर गावात निषेध सभा घेऊन पालखी विश्वस्तांचा धिक्कार केला आहे.