Uruli Kanchan : शिंदवणेत गॅंगवारचा भडका! महिनाभरापूर्वी जीवे मारण्याचा प्रयत्न झालेल्या मित्राचा मारहाणीचा बदला घेण्यासाठी एकावर वार..!!

Uruli Kanchan उरुळीकांचन : मित्राला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा राग मनात धरून महिनाभरापूर्वी झालेल्या भांडणाचा बदला घेण्यासाठी मित्राला मारहाण करणाऱ्या टोळक्याशी संबधीत असलेला एकावर कोयत्याने वार केल्याची घटना शिंदवणे -वळती फाट्यावर सोमवार (दि.१) रात्री आठच्या सुमारास घडली आहे. या हल्ल्यामागे विधीसंघर्षीत बालकाचा सामावेश असल्याने खळबळ उडाली आहे.

आदेश जनार्दन कामठे (वय -२९ रा. खंडोबाचा मळा ,शिंदवणे ता.हवेली , जि.पुणे ) असे कोयत्याने हल्ला झालेल्या तक्रारदाराचे नाव आहे. या प्रकरणी उरुळीकांचन पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ११८(१),१२६(२),३५१ (२)(३) या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भांडणाचा राग धरुन ऍक्टिवा गाडीने तक्रारदार आदेश कामठे हा शिंदवणे ग्रामपंचायत हद्दीतून वळती फाट्याकडे जात असताना विधीसंघर्षीत आरोपीने त्याच्याकडील शाईन गाडी थांबवून समोरुन येणाऱ्या आदेश कामठेला त्याची गाडी दम देऊन थांबविली.

‘गेल्या भांडणात तू वाचलास आता तुला सोडत नाही म्हणून तुला तोडतोच म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली’ आणि पशवीतून कोयता काढून माझ्या डाव्या हातावर वार केला. नंतर कोयत्याने अंगावर वार करीत आरोपीने पळ काढला आहे. या गुह्याचा अधिक तपास पोलिस हवालदार सचिन जगतापहे करीत आहे.
दरम्यान या हल्लाच्या घटनेमागे शिंदवणे गावात महिनाभरापूर्वी झालेल्या मित्राला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्याचा घटनेची पार्श्वभूमी आहे. या गावात मागील काळात अवैद्य धंदे, चोरीमारी करण्यासारखे गुन्हे दाखल असलेल्या नवोदीत तरुणांच्या दोन गटांच्या पूर्ववैमनस्याचा वाद आहे.