Uruli Kanchan : उरुळी कांचनमध्ये चोरट्यांनी वर्षश्रद्धाला गेलेल्या कुटूंबाचे घर हेरले, घर फोडून तीन लाखांचे दागिने केले लंपास..


उरुळी कांचन : घरातील सर्वजण नातेवाईकांच्या वर्षश्रद्धाला गेल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा दरवाजा तोडून 3 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली आहे.

ही घटना उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत अतिशय गजबजलेल्या आश्रमरोड परिसरातील सार्थपार्थ बिल्डींगमध्ये चौथ्या मजल्यावर शुक्रवारी (ता.३१) सकाळी अकरा ते दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातारावण आहे.

याप्रकरणी नारायण श्रीधर कुंभार (वय. ६१, व्यवसाय -फँब्रीकेशन , रा. आश्रमरोड, उरुळी कांचन ता. हवेली) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सविस्तर माहिती अशी की, नारायण कुंभार व त्यांचे कुटुंबीय उरुळी कांचन हद्दीत असलेल्या दत्तवाडी परिसरातील एका नातेवाईकांच्या वर्षश्रद्धाच्या कार्यक्रमाला घराला कुलूप लावून अकरा वाजण्याच्या सुमारास गेले होते.

कार्यक्रम झाल्यानंतर दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी आले त्यावेळी त्यांना घराचा दरवाजा उघडलेल्या अवस्थेत आढळून आला. यावरून त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. Uruli Kanchan

त्यांनी घरात जाऊन पाहणी केली असता घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. यावेळी कपाटाचे कुलूप खाली पडले होते. तसेच कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने दिसून आले नाही. दरम्यान, इतर ठिकाणी ठेवलेले काही लहान मुलांचे सोन्याचे दागिने दिसून आले नाहीत.

यावरून घरात चोरी झाल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.

दरम्यान, भर सोसायटीत वर्दळ असलेल्या ठिकाणी चोरट्यांनी दिवसा बंद घराचा दरवाजा तोडून लाखोंचा ऐवज चोरून नेल्याने एकच खळबळ उडाली आहे. तसेच उरुळी कांचन परिसरात घरफोड्या, अन्य किरकोळ चोरीच्या घटनांमुळे नागरिक हैराण झाले आहेत.

वाढत्या गुन्हेगारीने नागरिक हैराण झाले आहेत. भरदिवसा लुटमार सुरु झाल्याचे प्रकार दिवसागणिक वाढत चालले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!