Uruli Kanchan : कोयते बाळगून दहशत, उरुळी कांचन पोलिसांनी घेतले दोघांना ताब्यात, पाच लाखांचा मुद्देमाल केला जप्त..

Uruli Kanchan : दिवसागणिक गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या वेगात वाढले आहेत. सध्या असाच एक प्रकार समोर आला आहे.
पुणे- सोलापूर महामार्गावर कोरेगाव मूळ (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील एका हॉटेलच्या बाहेर उभ्या असलेल्या चारचाकी गाडीतुन दोन युवकांना दोन कोयत्यासह उरुळी कांचन ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी दोन कोयते आणि एक चारचाकी गाडी असा ५ लाख २ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
चंद्रशेखर दाजी चोरमुले (वय. २९, रा. माळी मळा, लोणी काळभोर, ता. हवेली) आणि आकाश मधुकर लांडगे (वय. १९, रा. बस स्टॉपच्या पाठीमागे, उरुळी कांचन, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. Uruli Kanchan
कोयता गँगमधील गुन्हेगारांना शहर पोलिसांनी बेदम चोप दिल्याच्या घटनेनंतर आता कोयता गॅंगचे लोन ग्रामीण भागात पोहोचले आहे. उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील आठ दिवसात ही दुसरी घटना घडली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, शुक्रवारी (ता. १६) सायंकाळच्या सुमारास एका खबऱ्या कडून माहिती मिळाली की, पुणे – सोलापूर महामार्गावरील कोरेगाव मूळ ग्रामपंचायत हद्दीतील पुणे-सोलापूर हायवे रोड लगत हॉटेल चायनीज कट्टा समोर उभ्या असलेल्या एका लाल रंगाच्या गाडीत दोघेजण कोयते बाळगून बसले आहेत.
या मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता एक लाल रंगाची चारचाकी गाडी दिसून आली. गाडीजवळ जाऊन गाडीत बसलेल्या दोघांना त्यांचे नाव आणि पत्ता विचारला असता त्यांनी त्यांचे नाव वरीलप्रमाणे सांगितले आहे.
दरम्यान, गाडीची पाहणी केली असता गाडीत एक हजार रुपये किमतीचे दोन कोयते मिळून आले. याप्रकरणी दोघांनाही उरुळी कांचन पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून २ लोखंडी कोयते व एक चारचाकी गाडी असा ५ लाख २ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कामगिरी उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील, पोलीस उपनिरीक्षक सुधीर पाडुळे, सहाय्यक फौजदार नवले, पोलीस हवालदार रणजीत निकम, रमेश भोसले, सचिन जगताप, पोलीस शिपाई दीपक यादव, सुदर्शन माने यांनी केली आहे.