Uruli Kanchan : अष्टापूर परिसरात बिबट्याचा वावर, रस्त्यावर बिबट्या आढळून आल्याने भितीचे वातावरण..!!


Uruli Kanchan  उरुळीकांचन : अष्टापुर ( ता.हवेली ) येथील गावठाण, माळवाडी परिसरामध्ये बिबट्याचा वावर आढळून आला आहे. एका ग्रामस्थाला उसाच्या शेतात बिबट्याचे दर्शन झाल्याने भितीचे वातावरण पसरले आहे. मागील दोन दिवसापासून अष्टापूर परिसरामध्ये शनिवार आणि रविवारी संध्याकाळी सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास बिबट्या नागरिकांच्या निदर्शनास आला आहे .

या घटनेची माहिती मिळाताच वनरक्षक भीकणे यांना अष्टापुर गावचे माजी उपसरपंच भाजपा सोशल मीडियाचे तालुकाध्यक्ष सोमनाथ कोतवाल यांनी फोन द्वारे दिली. त्यानुसार वनक्षेत्रपाल कर्मचारी सपकाळे, भीकणे, वनसेवक जाधव यांनी ज्या ठिकाणी बिबट्याचा वावर होता त्या ठिकाणी पायाच्या ठशाची पाहणी केली. त्यानुसार बिबट्याचे वास्तव्य परिसरात असल्याचे निदर्शनास आले आहे. Uruli Kanchan

अष्टापुर गावचे विद्यमान सरपंच अश्विनी कोतवाल, उपसरपंच गणेश कोतवाल व माजी सरपंच कविता जगताप, माजी उपसरपंच सोमनाथ कोतवाल, माजी उपसरपंच शामराव दादा कोतवाल, माजी उपसरपंच दत्तात्रय कटके, माजी उपसरपंच आबासाहेब कोतवाल, उद्योगपती राजेश कोतवाल व प्रगतशील बागायतदार पोपट दादा कोतवाल लक्ष्मण कटके व दिनकर निकाळजे समस्त ग्रामस्थ अष्टापुर यांनी अष्टापुर परिसरामध्ये वन अधिकाऱ्यांच्याकडे पिंजरा लावण्याची मागणी केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!