Uuli Kanchan : कौतुकास्पद! दिल्लीत इंडिया बुक ऑफ रेकॉर्डच्या कार्यक्रमांमध्ये उरुळी कांचन येथील दोन विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, विद्यार्थ्यांवर होतोय कौतुकाचा वर्षाव…

उरुळी कांचन : उरुळीकांचन (ता.हवेली ) येथील दोन विद्यार्थ्यांनी दिल्लीत मोठे यश मिळवले आहे. दिल्ली येथे झालेल्या “इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड ” च्या कॉन्वेकेशन कार्यक्रमांमध्ये अंश राहुल कांचन एंजल हायस्कूल उरुळी कांचन व ईनायत आयात मुलानी सायरस पुनावाला इंग्लिश मीडियम स्कूल उरुळी कांचन या दोन विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
त्यांना “इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड” तर्फे सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करताना आई-वडील तसेच एन.आय.बी.एम नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ब्रेन मास्टर या संस्थेचे विशेष आभार मानले. Uuli Kanchan
त्यांना सहा अंकी गुणाकार व भागाकार एका मिनिटांमध्ये २८ ते २९ गणिते सोडवण्याचा विक्रम केल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. यावेळी एनआयबीएम संस्थेचे डायरेक्टर नवनाथ हंबीर व विद्यार्थ्यांचे पालक राहुल कांचन व आयात मुलाणी उपस्थित होते.
त्यांच्या या यशामुळे सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे. यासाठी त्यांनी मोठी मेहनत घेतली होती. शिक्षकांनी त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले होते. यामुळे त्यांनी हे यश संपादन केले आहे.