Uruli Kanchan : उरुळीकांचन पोलिस ठाण्याचे पालकमंत्री बदलताच उद्घाटक बदलले! चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार उद्घाटन अजित पवार करणार..!!


जयदिप जाधव

Uruli Kanchan  उरुळीकांचन : राज्यात सत्ताकेंद्रात पालकमंत्रीपदाची महत्वाची पदे आपल्या पदरात पाडण्यात यशस्वी ठरलेल्या व राज्याच्या सत्ता केंद्रात ‘दादा सब पे भारी ‘ हा नवा हॅश टॅग ट्रेंड सुरू झालेल्या पालकमंत्री अजित पवार Ajit Pawar यांची आता पुणे जिल्ह्याच्या प्रशासनावर पुन्हा एकदा पकड मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. Uruli Kanchan

अडीच वर्षापूर्वी ‘दादांनीच’ मंजूर केलेल्या उरुळीकांचन या नवीन पोलिस ठाण्याच्या उद्घाटनासाठी गत पालकमंत्री चंद्रकांत पाटील Chandrakant Patil हे प्रतिक्षेतच असतानाच अचानक जिल्ह्याचा पालकमंत्री बदलल्याने या पोलिस ठाण्याचा उद्घाटन कार्यक्रम पोलिस प्रशासनाने बदलून आता नव्या पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्याचे निश्चित केल्याने जिल्ह्यातील बदलत्या घडामोडींची झलक प्रशासनावर दिसल्याने जिल्ह्यात आता नव्याने ‘दादा’ राज सुरू झाले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे सत्तेत सामील झाल्यानंतर पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद अजित पवार यांना मिळणार हे निश्चित झाले होते. मात्र राज्याच्या पालकमंत्रीपदाचा सुटकार हा तीन महिन्यांनंतर झाल्याने आता पुणे जिल्ह्यात अजित पवार यांची प्रशासनावर हुकूमत चालणार असल्याचे आधोरेखित झाले आहे. उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी झाल्यानंतर पुणे जिल्ह्याच्या पालक मंत्रीपदाची वर्णी ‘दादांची’लागणार म्हणून चर्चा होती .आता तीच चर्चा प्रत्यक्षात उतरली आहे. त्यानंतर आता दोन दिवसांतच पालकमंत्री बदलाचा प्रत्यय येण्यास सुरूवात झाली आहे.

जिल्ह्यातील तालुकानिहाय परिस्थिती अजित पवार यांना पूर्ण माहिती आहे. तालुकानिहाय विकासकामे व प्रलंबित प्रश्न हे दादा पूर्ण ज्ञात आहेत. सिंचनापासून ते वाहतूक कोंडी पर्यंत ची समस्या दादा पूर्ण सांगून अधिकाऱ्यांना कानपिचक्या देताना जिल्ह्याने पाहिले आहे.

तालुकानिहाय राजकीय परिस्थितीवर तर ते अगदी गल्लीबोळातील कार्यकर्त्यांना ओळखू शकतील अशी त्यांची ख्याती आहे. अशातच त्यांच्या पालकमंत्रीपदाने जिल्हयाची अपेक्षा वाढणार आहे. अशातच आता पालकमंत्रीपद बदलाचा व नवीन पोलिस ठाणे उद्घाटनाचा प्रशासकीय किस्सा तयार झाल्याने उद्घाटनाचा किस्सा आता प्रशासनाच्या नव्या बदलाचा संकेत देऊ लागला आहे.

अशातच अजित पवार यांची केंद्रीय पातळीवर यशस्वी शिष्टाई करणारे उपमुख्यमंत्री व भाजपचे राज्याचे सर्वेसर्वा देवेंद्र फडणवीस यांनी आता अजित पवार यांना पाच वर्षे मुख्यमंत्री करु असा जाहीर खुलासा केल्याने जिल्हा प्रशासन सावध झाल्याची चर्चा आहे.

त्यामुळे भविष्यात अजित पवार यांचाच शब्द प्रशासनात अंतिम राहण्याची शक्यता आहे. सत्तेच्या या प्रयोगात उरुळीकांचन पोलिस ठाण्याचे उद्घाटन हे एक भविष्यात बदलाचा भाग ठरल्याने जिल्ह्यात आता अजित पवार यांचा नवा अध्याय प्रशासनात भाजपसाठी डॅमेज कंट्रोल होणार म्हणून अशी चर्चा सुरू झाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!