Uruli Kanchan : राष्ट्रवादीच्या बैलगाडा शर्यतीत प्रदिप कंदांना मान! हवेलीत विधानसभेपूर्वीच राष्ट्रवादीचा एक गट भाजपच्या मदतीला..!!

जयदिप जाधव
Uruli Kanchan उरुळीकांचन : विधानसभा निवडणूकीला आता, दहा महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिल्याने आता राजकीय उलथापालथ सुरू होण्यास सुरुवात झाली आहे. शिरुर -हवेली मतदारसंघात तर नेहमीप्रमाणे राजकीय उलथापालथीचं ठरलेलं समीकरण यंदाच्या निवडणूकी तही उफाळून येतंय का, म्हणून शक्यता आणि चर्चांना बळ मिळू लागले आहे.Uruli Kanchan
हवेली तालुक्यात आता पुन्हा एकदा राष्ट्रवादीचा एक गट भाजपच्या मदतीला धावणार असल्याच्या शंकांना पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याच्या बैलगाडा शर्यतीच्या आयोजनाच्या निमंत्रण पत्रिकेवरुन तसेच निमंत्रण नाकारण्यावरुन अधोरेखित झाले आहे. त्यामुळे हवेली तालुक्यात राष्ट्रवादीच्या फूटीनंतर नाराजांनी थेट भाजपच्या इच्छुकांनाच आपलेसे करण्याचा निर्णय घेतल्याने या बदलत्या घडामोंडीनी हवेली तालुक्यात पुढील काळात मोठी राजकीय उलटफेर घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. Uruli Kanchan
हवेली तालुक्यात राष्ट्रवादी समर्थक असलेल्या व कधीकाळी विद्यमान आमदार अशोक पवार यांचे कट्टर समर्थक राहिलेल्या शिंदवणेच्या माजी सरपंच आण्णा महाडिक यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या बैलगाडा शर्यतीत विद्यमान आमदार अशोक पवार यांना निमंत्रण पत्रिकेत स्थान न देता कार्यक्रमापासून दूर ठेवले आहे. या घडामोडींनी एक चर्चा होऊन दुसरीकडे त्यांच्या जागी प्रदिप कंद यांना आदराचे स्थान दिले आहे.
या घडामोंडींनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवार यांच्या कार्यपद्धतीवर पदाधिकाऱ्यांनी रोष व्यक्त केल्याचे पुढे आले आहे. २००९ विधानसभा निवडणुकीपासून २०१४, २०१९ मध्ये क्रमक्रमाने आमदार अशोक पवार यांच्या कार्यपद्धतीवर अनेक पदाधिकाऱ्यांनी नाराज होऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मात्र यावेळीही राष्ट्रवादीचा एक गट भाजप मदतीला धावणार म्हणून आता चर्चांना सुरुवात झाली आहे.
शिरुर-हवेली मतदारसंघात गत निवडणुकीत भाजपचा मोठा पराभव झाला आहे. सामान्य कार्यकर्त्यांपासून ते एकनिष्ठ कार्यकर्त्यांमुळे अनेक कार्यकर्ते पक्षाला सोडून जाऊनही राष्ट्रवादीला मतदारसंघात मोठे मताधिक्य मिळाल्याने आमदार अशोक पवार यांची एकनिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर मोठी कौतुकाची थाप बसेल अशी अपेक्षा कार्यकर्त्यांना होती. मात्र या निवडणूकीनंतर अडीच वर्षे सत्तेत असताना व अडीच वर्षांनी सत्ता गेल्यानंतर आमदार अशोक पवार यांच्या कार्यपद्धतीवर पदाधिकाऱ्यांनी बोट ठेवल्याने नाराजांनी थेट वेगळा मार्ग शोधल्याची चर्चा सुरू झाली आहे.
अशातच आता शिंदवणेच्या माजी सरपंच आण्णा महाडीक यांनी आयोजित केलेल्या बैलगाडा शर्यतीच्या आयोजनात आमदार अशोक पवार यांना निमंत्रणावरुन थेट डावलल्याने नाराजीचा आणखी एक अध्याय पुढील निवडणूकीच्या तोंडावर उभा राहिला आहे.
या नाराजीत तालुक्यात आणखीही काही राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी असून ते पुढील काळात भाजपच्या मदतीला उतरणार असल्याचे बोलले जात आहे. या संपूर्ण घडामोंडीत पूर्व श्रमीचे राष्ट्रवादी नेते आणि भाजपचे विधानसभेचे दावेदार प्रदिप कंद यांना तालुक्यातून आयते बळ मिळणार आहे.