Uruli kanchan : चोरुन वीज वापरणे पडणार महागात! उरुळी कांचनच्या दोन व्यावसायिकांवर वीज चोरीचा गुन्हा दाखल…

Uruli kanchan : उरुळी कांचन (ता.हवेली) येथे दोन ठिकाणी वीज चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात दोघा व्यावसायिकांवर वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकणी अंकुश शिवाजी मोरे, (वय.३०, रा. सी-१ स्वरगंधार सोसायटी, उरुळी कांचन ता.हवेली) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दशरथ वसंत कुंजीर उरूळी कांचन (ता.हवेली जि.पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
सविस्तर माहिती अशी की, दशरथ कुंजीर १२. ०३.२०२४ पर्यंत एकूण 192820.00/- रु. किमती ची. 8870 युनिट ची वीज चोरी केलेचे निष्पण झाले. ते बिल त्यांनी स्वीकारले आहे. ते त्यांनी भरले आहे. दरम्यान त्यांच्याकडून दुसरी वेळ वीज चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

दुसरी घटना..
१५.०३.२०२४ पर्यंत एकूण 255050 /- रु. किमती ची. 8049 युनिट ची वीज चोरी केली म्हणून उरुळी कांचन पोलीस ठाण्यात अंकुश शिवाजी मोरे, वय. ३०), रा. सी-1 स्वरगंधार सोसायटी, उरुळी कांचन ता.हवेली) यांनी फिर्याद दिली आहे.
त्यानुसार तानाजी मानसिंग काळभोर ( घर क्र. 5579, पुणे सोलापूर रोड लागत असलेल्या तीन मजली बिल्डींगमध्ये उरूळी कांचन ता.हवेली जि.पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.