Urmila Matondkar : उर्मिला मातोंडकरचा ८ वर्षांचा संसार होणार उद्ध्वस्त, नवऱ्याला देणार घटस्फोट…
Urmila Matondkar : झगमगत्या विश्वात घटस्फोट आता सामान्य गोष्ट झाली आहे. आता अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने देखील पती मोहसिन अख्तर मीर याच्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. अभिनेत्रीने लग्नाच्या ८ वर्षांनंतर घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे. उर्मिला हिचे वैवाहिक आयुष्य आता कायद्याच्या कचाट्यात अडकले आहे.
उर्मिलाने घटस्फोटासाठी अर्जही दाखल केला आहे. मुंबईतील एका न्यायालयाच्या सूत्रानुसार, उर्मिलाने चार महिन्यांपूर्वी घटस्फोटासाठी अर्ज केला होता. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त उर्मिलाच्या घटस्फोटाची चर्चा सुरु आहे.
पण यामागचं नक्की कारण अद्याप समोर आलेले नाही. अभिनेत्रीने देखील यावर अधिकृत वक्तव्य केलेलं नाही. सर्व बाजूंनी विचार केल्यानंतर उर्मिला हिने घटस्फोटाचा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे.
उर्मिला आणि मोहसीन सहमतीने वेगळे झालेले नाहीत. सुत्रांच्या माहितीनुसार, काळजीपूर्वक विचार केल्यानंतर उर्मिलाने मोहसीनसोबत घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. तिने न्यायालयात याआधीच घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. पण त्यांचे वेगळे होण्यामागील कारण अद्याप कळू शकलेले नाही. पण त्यांचा वेगळे होण्याचा निर्णय परस्पर सहमतींने झालेला नाही. Urmila Matondkar
उर्मिला एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री असून मोहसीन हा एक काश्मिरी उद्योजक आणि मॉडेल आहे. दोघांनी ४ फेब्रुवारी २०१६ रोजी एका साध्या सोहळ्यात लग्नगाठ बांधली होती. त्यांच्या लग्नावेळी केवळ त्यांचे जवळचे मित्र आणि कुटुंबीय उपस्थित होते.
दोघांची भेट बॉलिवूड डिझायनर मनीष मल्होत्रा याच्या भाचीच्या लग्नात झाली होती. दोघांच्या वयात १० वर्षांचे अंतर आहे.उर्मिला मातोंडकरने वयाच्या ४२ व्या वर्षी मोहसीन अख्तरसोबत लग्न केले होते. मोहसीन उर्मिलापेक्षा १० वर्षांनी लहान आहे.