मोठी बातमी! अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या कारने मजुरांना चिरडलं, एकाचा जागीच मृत्यू…

मुंबई : अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या कारचा अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. मुंबईतील कांदिवली परिसरातील पोईसर मेट्रो स्टेशनजवळ ही घटना घडली. काल शुक्रवारी ता. घडलेल्या या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
उर्मिला कोठारे शूटिंग संपवून घरी परतत होती, त्यावेळी तिच्या कारचा अपघात झाला. चालकाचं कारवरील नियंत्र सुटल्याने हा अपघात झाला. कारने दोन मजुरांना उडवलं, त्यापैकी एकाचा मृत्यू झाला असून दुसरा मजूर गंभीर जखमी आहे. या अपघातात उर्मिला आणि तिचा ड्रायव्हरही जखमी झाल्याची माहिती आहे.
मुंबईतील कांदिवली परिसरातील पोईसर मेट्रो स्टेशनजवळ ही घटना घडली. मेट्रोमध्ये काम करणाऱ्या दोन मजुरांना भरधाव कारने धडक दिली, या घटनेत एका मजुराचा मृत्यू झाला, तर दुसरा मजूर गंभीर जखमी झाला. ही कार मराठी अभिनेत्री उर्मिला कोठारेची असल्याची माहिती आहे.
त्याचप्रमाणे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री उर्मिला काल रात्री तिचे शूटिंग संपवून कारमधून घरी जात होती. वेग जास्त असल्याने चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि भरधाव वेगाने जात असलेल्या कारने रस्त्याच्या कडेला काम करणाऱ्या दोन मेट्रो कर्मचाऱ्यांना धडक दिली.
ज्या मजूरांना उर्मिलाच्या कारने उडवलं ते दोन्ही मजूर हे मेट्रोमध्ये काम करणारे होते, अशी माहिती समोर आलेली आहे. उर्मिलाही या अपघातात जखमी झालीये. पण एका मजूराचा यामध्ये मृत्यू झालाय. त्यामुळे सध्या पोलिसांचा तपास त्या दिशेने सुरु असल्याचं सांगण्यात आलंय. मुंबईतील समतानगर पोलिसांनी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.