रिपब्लिकन पक्षाचे 24 जानेवरी रोजी महाबळेश्वरमध्ये अभ्यास शिबीर केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांची माहिती…!
मुंबई : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे एक दिवसीय अभ्यास शिबीर येत्या मंगळवार 24 जानेवारी रोजी महाबळेश्वर येथील ब्ल्यू पार्क हॉटेल येथे आयोजित करण्यात आले असल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे.
रिपब्लिकन पक्ष व्यापक आणि मजबूत करण्यासाठी ; रिपब्लिकन पक्षात सर्व जाती धर्मियांना सोबत घेऊन राजकीयदृष्ट्या पक्ष संघटन व्यापक करण्यासाठी या अभ्यास शिबिरात विचारमंथन करण्यात येणार आहे. रिपाइं च्या या एक दिवसीय अभ्यास शिबिरात दलित आदिवासी अल्पसंख्यांक मागासवर्गीय सर्व समाज घटकांच्या विषयावर चर्चा होणार आहे. रिपाइं च्या एक दिवसीय अभ्यास शिबिरात डॉ.शरण कुमार लिंबाळे ; डॉ.अच्युत माने; प्रा.ऋषिकेश कांबळे; प्रा.अरुण खोरे; अनिलकुमार सपकाळ हे विचारवंत मार्गदर्शन करणार असून रिपाइं कसा व्यापक आणि मजबूत होईल याबाबत या अभ्यास शिबिरात विचारवंत मार्गदर्शन करणार आहेत अशी माहिती ना.रामदास आठवले यांनी दिली आहे.
रिपाइं च्या या एक दिवसीय अभ्यास शिबिराला रिपाइं चे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले उपस्थित राहणार असून राज्य भरातील रिपाइंचे राज्य आणि राष्ट्रीय कार्यकारीणी सदस्य आणि प्रमुख पदाधिकारी जिल्हा अध्यक्ष यांना निमंत्रित करण्यात आले आहे. रिपाइं चे एकदिवसीय अभ्यास शिबीर महाबळेश्वर येथील राजभवन रोड; लॉर्ड विक पॉईंट रोड वरील हॉटेल ब्ल्यू पार्क येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती रिपाइं चे सातारा जिल्हा अध्यक्ष अशोक गायकवाड यांनी दिली आहे.