पुणेकरांसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मोठी घोषणा! म्हणाले पुण्यातून पेट्रोल- डीझेल…
पुणे : पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. पुणे शहरातून पेट्रोल-डिझेल हद्दपार करणार असल्याची घोषणा केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यात केली.
चांदणी चौक नुतणीकरणानंतरच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना त्यांनी पुणे शहराला प्रदुषणमुक्त करण्याचा मानस बोलून दाखवला. यासाठी त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना महत्वाच्या सूचना देखील दिल्या आहेत.
गडकरी पुढे म्हणाले, पुणे शहर आज खूपच प्रदुषित झाले आहे. मी ट्रोन्सपोर्ट मंत्री आहे त्यामुळे मी ठरवले आहे की, पेट्रोल-डिझेल या देशातून हद्दपार करायचं. त्यामुळं इलेक्ट्रिक, इथेनॉल, मिथेनॉल, एलएनजी, बायो एलएनजी, बायो सीएनजी यावर मी स्वतः आग्रहानं काम करतो आहे. मी स्वतः दिल्लीत आता हायड्रोजनच्या गाडीत फिरतो, इलेक्ट्रिकच्या गाडीत फिरतो”
दरम्यान, पुण्याला जर पेट्रोल-डिझेलपासून मुक्त केले तर प्रदुषण कमी होईल. आता इलेक्ट्रिक तर आलंच आहे. येत्या पाच वर्षात सर्व बसेस इलेक्ट्रिकवर चालणार आहेत.
आता पुण्यापासून मुंबई, नाशिक तसेच पुणे ते नागपूरपर्यंत इलेक्ट्रिक बस चालणार आहेत. फडणवीस आणि मी नागपूरमध्ये रिंगरोडवर केबलवर इलेक्ट्रिक बस सुरु करतो आहोत, असेही यावेळी गडकरी म्हणाले.