केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज करणार पालखी महामार्गाची पाहणी, काम प्रगतीपथावर

पुणे : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज पालखी महामार्गाची पाहणी करणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून या रोडचे काम सुरू आहे. पुणे व सोलापूर जिल्ह्याला जोडणारा व राष्ट्रीय महामार्ग असलेल्या संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज राष्ट्रीय महामार्गाची काम सध्या सुरू आहे.

या दौऱ्यासाठी गडकरी सकाळी साडेआठ वाजता नागपूरहून उड्डाण करून विशेष विमानाने ते पुण्यात येणार आहेत. ते त्यानंतर पुण्यातून हेलिकॉप्टरने ते आळंदी, हडपसर, जेजूरी, लोणंद, धर्मपुरी, तोंडले, पंढरपूर अशी पाहणी करणार आहेत.
दरम्यान, या पाहणीत ते ज्ञानेश्वर महाराज राष्ट्रीय पालखी महामार्गाची पाहणी करतील. त्यानंतर पुन्हा पंढरपूर ते वाखरी, तोंडले, इंदापूर, बारामती, पाटस, हडपसर, देहू, पुणे शहर अशी हेलिकॉप्टरने परतीच्या प्रवासातून पाहणी करणार आहेत. हे काम सध्या काही प्रमाणावर पूर्ण झाले आहे.

दरम्यान, यानंतर ते बारामतीतील नियोजित कार्यक्रमास उपस्थिती दाखविणार आहेत. यामुळे या कामाबद्दल ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच ते बारामतीत देखील येणार असल्याने या दौऱ्यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.