केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या पुणे दौऱ्यावर, वाहतुकीत झाला बदल, जाणून घ्या…


पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुणे दौऱ्यावर येणार आहे . पिंपरी चिंचवडमधील रामकृष्ण मोरे सभागृहात अमित शाहांचा कार्यक्रम पार पडणार आहे. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सहकार मंत्री उपस्थित राहणार आहेत.

तसेच आता चिंचवडमधील वाहतुकीत पोलिस प्रशासनाकडून बदल करण्यात आला आहे.

वाहतुकीतल बदल पुढील प्रमाणे..

महावीर चौक – महावीर चौकाकडून चिंचवडगावाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी करण्यात येत आहे. त्यामुळे पर्यायी मार्गावरून ही वाहने महावीर चौकाकडून खंडोबा माळ चौक येथून इच्छित स्थळी जातील.

दर्शन हॉल लिंक रोड – लिंकरोडकडून अहिंसा चौकाकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी करण्यात येतं आहे.

पर्यायी मार्ग: वाहने मोरया हॉस्पिटल चौकाकडून इच्छित स्थळी जातील.

रिव्हर व्ह्यू चौक: अहिंसा चौक बाजूकडे जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आली असून ही वाहने या चौकाकडून वाल्हेकरवाडी, बिजलीनगरमार्गे इच्छित स्थळी जातील.

दरम्यान, हा सर्व बदल रविवारी (उद्या, ता. ६) सकाळी आठ ते दुपारी तीन पर्यंत असणार आहे, असेही पोलिस आयुक्तांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!