उद्धव ठाकरेंना सुप्रीम कोर्टाचा तात्पुरता दिलासा ; मशाल ‘ चिन्ह आणि ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ नाव तूर्तास कायम..!
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव व धनुष्यबाण पक्षचिन्ह शिंदे गटाला दिले. यांनतर निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटानं सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली आहे. याबाबत आज सुनावणी देखील पार पडली आहे.
आजच्या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टाने ठाकरे गटाला मोठा दिलासा दिला आहे. ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह ही सुनावणी प्रलंबित असेपर्यंत वापरता येणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ठाकरे गटासाठी हा दिलासादायक निर्णय समजला जात आहे.
निवडणूक आयोगानं आम्हाला असं सांगितलं आहे की, जोपर्यंत पोटनिवडणूक चालू आहे, तोपर्यंतच मशाल हे चिन्ह आणि तुमचं नाव मिळू शकेल” मात्र सुप्रीम कोर्टात या प्रकरणाची सुनावणी चालू आहे. त्यामुळे ती संपेपर्यंत तरी आम्हाला चिन्ह आणि नाव वापरण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी ठाकरे गटाचे वकील अॅड. कामत यांनी केली. त्यामुळे त्यांच्या या मागणीवर सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी होकार दर्शवला आहे.