उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा मोठा धक्का! बड्या नेत्यावरील नाराजीमुळे अनेक पदाधिकारी सोडणार पक्ष..

मुंबई : राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. अशातच आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांना विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर एकामागे एक धक्के बसत आहे.

विधानसभा निवडणुकीत त्यांच्या शिवसेनेला यश आले नाही. त्यानंतर राज्यभरातील अनेक पदाधिकारी त्यांची साथ सोडू लागले आहे. आता अहिल्यानगर शहरातून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना उबाठाचे माजी नगरसेवक आणि पदाधिकारी पक्ष सोडणार आहे.
या सर्वांची नाराजी पक्षातील बडे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अहिल्यानगर पक्षातील १२ माजी नगरसेवकांसह पदाधिकारी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई येथे शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहे.

खासदार संजय राऊत यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन सर्व शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. अहिल्यानगर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून २० ते ३० गाड्या घेऊन शिवसैनिक मुंबईकडे रवाना झाले आहे.