रोज दोन कोटी भाविक, नजर जाईल तिकडे भक्तांची रीघ, महाकुंभमेळा कसा असणार? जाणून घ्या…

लखनऊ : प्रयागराज येथे १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारीदरम्यान महाकुंभ मेळा होणार आहे. या महाकुंभची तयारी प्रशासनाने पूर्ण केली आहे. महाकुंभला येणाऱ्या भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून विशेष उपाययोजना केल्या जात आहेत.

पौष पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर पहिले शाही स्नान होणार आहे. दुसरे शाही स्नान मकर संक्रांतदिनी (दि.१४) होणार आहे. शाही स्नानाआधीच २५ लाख भाविकांनी पवित्र संगमात डुबकी घेतली. रोज दोन कोटींहून अधिक भाविक महाकुंभला भेट देण्याची शक्यता आहे.
तसेच महाकुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सर्व तयारी केली आहे. भाविकांची गर्दी वाढत आहे. शाही स्नानाआधीच संगमामध्ये २५ लाखांहून अधिक भाविकांनी स्नान केले आहे. प्रत्येक दिवशी दोन कोटींवर भाविक प्रयागराजमध्ये दाखल होणार आहेत.

पहिल्या शाही स्नानासाठी प्रशासनाने १०. ५ कि.मी. लांबीचा घाट तयार केला आहे. अखाड्यातील प्रवेशासाठी दोन विशेष रस्ते तयार करण्यात आले आहेत. नागा साधूंसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. आपत्कालीन स्थितीसाठी विशेष मार्ग तयार करण्यात आला आहे.
महाकुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अॅपलचे सहसंस्थापक स्टीव जॉब्ज यांच्या पत्नी लॉरेन्स पॉवेल यांनी मंदिरास भेट देऊन प्रार्थना केली. स्वामी कैलाशनंदगिरीजी महाराज यांच्यासोबत पॉवेल प्रयागराजला जाणार आहेत. पॉवेल यांनी भारतीय पोषाख परिधान करून विश्वनाथ मंदिरात प्रार्थना केली.
दरम्यान, साधारण चार हजार हेक्टर क्षेत्रावर महाकुंभसाठी तात्पुरते नगर वसविण्यात आले आहे. महाकुंभच्या कालावधीत ४० कोटी भाविक प्रयागराजला भेट देण्याची शक्यता आहे. अंडरवॉटर ड्रोनद्वारे नजर ठेवण्यात येणार आहे. वीज, पाणी, स्वच्छता आणि आपत्कालीन सेवांसाठी प्रशासन तत्पर आहे.