जवानाच्या पत्नीवर दोन दिरांनी केला बलात्कार, नको त्या अवस्थेत व्हिडीओ काढले आणि…


उत्तर प्रदेशमधील पिलीभीत येथे एक धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी बीएसएफमध्ये सेवेत असलेल्या जवानाच्या पत्नीवर तिच्याच दोन दिरांनी वारंवार बलात्कार केल्याची घटना घडली आहे. तसेच तिचे अश्लील व्हिडीओ तयार करून तिला ब्लॅकमेल केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

तांबाबत या महिलेच्या सासरच्या मंडळींसह एकूण ७ जणांविरोधात गुन्दा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत. पोलिसांनी एका आरोपी दिराला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी जहानाबाद पोलीस ठाण्याचे प्रभारी मनोज कुमार मिश्रा यांनी सांगितले की, पीडितेच्या तक्रारीवरून सासूसासऱ्यांसह एकूण ७ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच या प्रकरणातील एक आरोपी असलेला दीर हरिओम याला अटक करण्यात आली आहे. आता पोलिसांकडून इतर आरोपींचा शोध सुरू आहे. पीडित महिलेने सांगितले की, लग्नानंतर मी मझ्या सासूसह गावाबाहेर वेगळ्या घरात राहते. माझे पती बीएसएफमध्ये आहेत. त्यामुळे ते नेहमीच कर्तव्यावर असतात. जेव्हा माझी सासू तिथून गावातील घरी जायची तेव्हा माझे दोन दीर घरात घुसायचे.

तसेच माझ्यावर बलात्कार करायचे. त्यांनी बलात्कार करतानाचे व्हिडीओ काढले आहेत. विडिओ काढताना त्यांनी नको त्या अवस्थेत त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे. नंतर त्यांनी अनेकदा पती घरी नसताना या व्हिडीओंचा वापर करून ते मला ब्लॅकमेल केले आणि अनेक कृत्य करायला भाग पाडले आहे. यामुळे ती महिला गप्प राहिली.

माझे पती सुट्टी घेऊन गावी आले, तेव्हा त्यांनी त्यांनाही हे व्हिडीओ दाखवले. तसेच त्यांना मारहाण देखील केली. आरोपींनी माझीही हत्या करण्याचा प्रयत्न केला, असा आरोपही पीडितेने केला आहे. याप्रकणी सध्या पोलिसांनी तपास सुरु केला आहे. याबाबत फरार आरोपीचा शोध सध्या पोलीस घेत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!