छत्रपती कारखाना निवडणूकीत मोठा ट्विस्ट!! कारखाना बिनविरोध होणार? पृथ्वीराज जाचक यांनी बोलावलेल्या मेळाव्यास खुद्द अजित पवार उपस्थित राहणार…..

भवानीनगर : येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना लि. भवानीनगर या कारखान्याच्या निवडणुकीची नुकतीच घोषणा करण्यात आली. यामुळे आता अनेकांनी तयारी सुरु केली आहे. कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज बापू जाचक यांनी देखील आता निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. त्यांनी आज मेळावा घेतला आहे. असे असताना रात्री काही घडामोडी घडल्याने आता कारखाना बिनविरोध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
याचे कारण म्हणजे या मेळाव्यास उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री दत्तात्रय भरणे देखील उपस्थित राहणार आहेत. यामुळे याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. छत्रपती सहकारी साखर कारखाना लि. भवानीनगर या कारखान्याच्या निवडणुकीच्या विचारविनिमयार्थ पृथ्वीराज बापू जाचक यांच्या नेतृत्वाखाली आज दुपारी १२:३० वाजता छत्रपती मंगल कार्यालय भवानीनगर येथे बैठक आयोजित करण्यात आलेली आहे.
रात्री मात्र काही घडामोडी घडल्याने आता अजित पवार देखील दुपारी दीड वाजता उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे आता रंगत वाढली आहे. शेतकरी कृती समितीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर नुकतीच टीका केली होती. मात्र आज तेच या कार्यक्रमात येणार असल्याने याची जोरदार चर्चा सुरू झाली असून सभासद संभ्रमात आहेत.
छत्रपती सहकारी साखर कारखाना हा राजकीय दृष्ट्या एक महत्त्वाचा कारखाना असून सध्या कारखान्याची सत्ता अजित पवार गटाकडे आहे. मात्र गेल्या काही वर्षात कारखान्याला मिळालेला कमी बाजारभाव यामुळे सभासदांमध्ये नाराजी आहे. यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची निवडणूक आहे. यामुळे अजित पवारांवर टीका केली जात होती.
आता मात्र आज अजित पवार नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच अजित पवार आणि जाचक काय घोषणा करणार याची सभासदांमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे. रात्री दीड वाजता याबाबत जाचक यांच्या समर्थकांकडून अजित पवार येणार असल्याचे सांगितले आहे.