मोठी बातमी! काँग्रेसच्या अडचणीत वाढ, थेट राष्ट्रीय अध्यक्षांच्या विरोधात वॉरंट जारी, नेमकं घडलं काय?


नवी दिल्ली : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांच्या नावे थेट वॉरंट जारी कऱण्यात आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यांना हा वॉरंट का जारी करण्यात आला आहे, नेमकं काय झालं? याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत.

पंजाबमधील संगरूर येथील न्यायालयाने मल्लिकार्जुन खरगे यांच्याविरोधात जामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे. खर्गे यांनी 19 सप्टेंबर 2026 रोजी स्वतः न्यायालयात हजर रहावे, असे आदेश न्यायालयाने त्यांना दिले आहेत. याबाबत अजून त्यांनी काही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.

न्यायालयाच्या आदेशानुसार,खरगे यांना वैयक्तिकरित्या उपस्थित राहून जामीन प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. प्रकरण 2023 मधील कर्नाटक विधानसभा निवडणुकीशी संबंधित आहे. संगरूर येथील रहिवासी आणि बजरंग दलाशी संबंधित हितेश भारद्वाज यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या एका वक्तव्याविरोधात न्यायालयात तक्रार दाखल केली होती.

या तक्रारीवर सुनावणी करताना न्यायालयाने आता पुढील कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रचारात मल्लिकार्जुन खर्गे यांनी बजरंग दलासंदर्भात एक वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यात त्यांनी बजरंग दलाची तुलना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेशी केली होती.

काँग्रेसचे सरकार सत्तेत आल्यास बजरंग दलावर बंदी घालण्याचा विचार केला जाऊ शकतो, असेही खरगे यांनी म्हटले होते. आता कोर्टात नेमकं काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बजरंग दालचे हितेश भारद्वाज यांनी या वक्तव्यावर आक्षेप घेत न्यायालयात धाव घेतली होती.

दरम्यान, खर्गे यांच्या वक्तव्यामुळे संघटनेची प्रतिमा खराब झाली असून भावना दुखावल्या गेल्या आहेत असे भारद्वाज यांचे म्हणणं होते. न्यायालयाने मल्लिकार्जुन खर्गे यांच्या विरोधात 15 हजार रुपयांचा जामीनपात्र वॉरंट जारी केला आहे. आता त्यांना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!