त्रिपुरा विधानसभेच्या ६० जागांसाठी मतदान प्रक्रिया सुरू ;दिग्गज उमेदवार विधानसभेच्या रिंगणात…!


आगरताळा : त्रिपुरा विधानसभेच्या ६० जागांसाठी सकाळी ७ वाजता मतदान सुरू झाले आहे. एकूण २५९ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात असून सर्वत्र कडेकोट बंदोबस्तात मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे.

त्रिपुरातील जनतेला विक्रमी संख्येने मतदान करण्याचे आणि लोकशाहीचा सण बळकट करण्याचे आवाहन करून, मी विशेषतः तरुणांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन करतो, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

त्रिपुरा विधानसभेत मुख्यमंत्री माणिक साहा शहर बारडोवली मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. तर केंद्रीय मंत्री प्रतिमा भौमिक धानपूर मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. त्रिपुरामध्ये मतदान झाल्यानंतर २ मार्चला निकाल लागणार आहेत. सीपीआयएमचे राज्य सचिव जितेंद्र चौधरी, जे डावे-काँग्रेस आघाडीचे उमेदवार आहेत, ते सबरूम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!