परिवहन मंत्र्यांचीं शाळा व महाविद्यालयासाठी खुशखबर ; विद्यार्थ्यांसाठी 800 ते 1000 बस दररोज उपलब्ध…

पुणे : महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन मंडळाने शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे.राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महाविद्यालयीन आणि शालेय सहलींसाठी दररोज 800 ते 1000 नवीन बसेस उपलब्ध करण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धीपत्रकात असे म्हटले की, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एमएसआरटीसी) बस डेपोमधून शाळा आणि महाविद्यालयांना दररोज सुमारे 800 ते 1000 नवीन बसेस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परवडणारा आणि सुरक्षित प्रवास करण्यासाठी भाड्यात 50 टक्के सवलत दिली आहे. या निर्णयामुळे शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. एमएसआरटीसीने या वर्षापासून शालेय वार्षिक सहलींसाठी विद्यार्थ्यांना स्वस्त आणि सुरक्षित प्रवास मिळावा यासाठी नवीन बसेस उपलब्ध करून देत आहेत.
दरम्यान दिवाळीच्या सुट्टीनंतर, शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी वार्षिक शैक्षणिक सहलींसाठी उत्सुक असतात. विद्यार्थ्यांच्या आनंदासाठी राज्य सरकार शालेय सहलींच्या एकूण भाड्यात 50 टक्के सूट देणार आहे. नोव्हेंबर 2024 ते फेब्रुवारी 2025 या कालावधीत एमएसआरटीसीने शैक्षणिक सहलींसाठी 19,624 बसेस पुरवल्या होत्या, ज्यामुळे राज्य परिवहन मंडळाला 92 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला होता, अशी माहिती प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आली आहे.
