झाले सुरू ! हवेली बाजार समितीत राजकीय सुडापोटी बदल्या? क्रीम पोस्टसाठी वशिलेबाजी, निवडणुकीचे पडसाद
पुणे : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (हवेली) निवडणुकीनंतर अनेक घडामोडी घडत आहेत. आता नवनियुक्त संचालक मंडळाने अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका लावला आहे. येथील ठराविक कर्मचाऱ्यांना साइड पोस्टिंग देत मर्जीतील अधिकायांची क्रीम पोस्टिंगवर वर्णी लावली आहे.
काही बदल्या राजकीय सुडापोटी केल्याचे समोर आले आहे. बाजार समितीत फळे-भाजीपाला, गूळ भुसार, मांजरी, मोशी, उत्तमनगर आदी विभाग ही प्रमुख पदे महत्त्वाची मानली जातात. या पदांवर गेल्या अनेक वर्षांपासून या विभागाच्या प्रमुखपदी सेवाज्येष्ठता डावलून बदल्या झालेले कर्मचारी कर्मचाऱ्यांची वर्णी लावली होती.
नवनियुक्त संचालक मंडळाने देखील काही ठराविक बदल्या वगळता पुन्हा तोच कित्ता गिरवला आहे. अनेक ठिकाणी बदल्यांमध्ये राग काढण्यात आला आहे.
यावेळी सभापती दिलीप काळभोर म्हणाले, अनेकवर्षे बदल्या झाल्या नव्हत्या. आता नियमाप्रमाणे सेवाज्येष्ठतेनुसार अधिकारी, कर्मचायांच्या बदल्या केल्या आहेत. तोलणारांच्या बदल्या केलेल्या नाहीत, असे त्यांनी स्पष्ठ केले आहे.