चांदणी चौकातील वाहतूक ४ जुलैपासून राहणार बंद! पुलाचे काम होणार सुरू…


पुणे : पुण्यातील चांदणी चौक प्रकल्पाच्या मुख्य पुलाच्या गर्डर उभारणीसाठी पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गवर ४ जुलै ते १५ जुलै या कालावधीत रात्री १२.३० ते पहाटे ३.३० वाजेपर्यंत ३ तास मुख्य रस्त्यावरील वाहतूक सेवा रस्त्याने नियंत्रित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

यामुळे याकाळात हा रोड बंद राहणार आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अंतर्गत एनएचएआयच्या भारतमाला परियोजनेअंतर्गत पुणे शहरातील चांदणी चौक जंक्शनवर एकात्मिक संरचना पूलाचे बांधकाम करण्यात येत आहे.

पुलाच्या कामाच्या अनुषंगाने वाहतूक वळविण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले. या चांदणी चौक प्रकल्पाचे ९५ टक्के काम पूर्ण झाले असून ते अंतिम टप्यात आहे.

नवीन एनडीए- पाषाण मुख्य पुलाचे काम सबस्ट्रक्चर पातळीपर्यंत झाले असून सुपरस्ट्रक्चरचे काम प्रगतीपथावर आहे. त्या अनुषंगाने हा वाहतूक बदलाचा निर्णय घेण्यात आला आहे.

यामध्ये मल्टी ॲक्सेल वाहनांची वाहतूक ३ तासांसाठी रोखण्यात येणार आहे. ही वाहने मुंबई एक्सप्रेस-वे, तळेगाव टोल नाका व मुंबई-पुणे जुना महामार्ग, सोमाटणे टोल नाका या ठिकाणी थांबवली जातील व साताराकडून येणारी वाहने खेड शिवापूर टोल नाका येथे थांबवली जातील.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!