पुण्यातील वाहतूक कोंडीची समस्या सुटणार, रिंग रोड संदर्भात आत्ताचा सर्वात मोठा निर्णय, जाणून घ्या…


पुणे : पुणे शहरात आता मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या जाणवू लागली आहे. वाहतूक कोंडीमुळे पुणेकरांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत असून ही वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रशासनाच्या माध्यमातून आता प्रयत्न केला जात आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येथील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाकडून बाह्य रिंग रोड विकसित केला जात आहे.

तसेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण देखील एक नवीन रिंग रोड तयार करणार आहे. यामध्ये आता पीएमआरडीकडून विकसित केल्या जाणाऱ्या रिंग रोडला जोडणारे 15 महत्त्वाचे इंटरचेंज विकसित करण्यात येणार आहे. यामुळे येणाऱ्या काळात याचा फायदा होणार आहे.

यासाठी 145 कोटींचा खर्च केला जाणार आहे. पुणे रिंग रिंग रोड प्रकल्प अंतर्गत 15 इंटरचेंज विकसित झाल्यास वाहतूक कोंडी कमी होईल. पीएमआरडीएने आपला अर्थसंकल्प मांडला आणि यामध्ये नियोजित रिंग रोड, पुणे-सातारा मार्गासाठी भरीव निधीची तरतूद करून देण्यात आली आहे. यामुळे कामे लवकरच सुरू होतील.

दरम्यान, पुणे-नगर रस्त्यापासून प्रस्तावित पुरंदर विमानतळाला ‘कनेक्टिव्हिटी’ तयार करण्यात येणार असून, त्यासाठीही भरीव तरतूद यात करण्यात आली आहे. यामुळे शहराच्या आतमध्ये जास्त प्रमाणात वाहतूक राहणार नाही. तसेच पुणेकरांना लवकरच एका मेट्रो मार्गाची भेट मिळणार आहे.

यामध्ये बहिंजवडी ते शिवाजीनगर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून मेट्रो मार्ग विकसित केला जात आहे. हा प्रकल्प पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप तत्त्वावर साकारला जात आहे. हा मेट्रो मार्ग ऑक्टोबर महिन्यात खुला होण्याची शक्यता आहे. याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!