Tomato Prices : टोमॅटोचे भाव कोसळले! पुणे- सोलापूर महामार्गावर संतप्त शेतकऱ्याचा शेतमाल रस्त्यावर फेकून रास्ता-रोको..


Tomato Prices : मागच्या काही दिवसापूर्वी टोमॅटोला उचांकी दर मिळत होता. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत होते. मात्र आता हाच टोमॅटो शेतकऱ्यांना रडवत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहेत.

टोमॅटोच्या कोसळलेल्या दरामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्याने पुणे- सोलापूर महामार्गावर टोमॅटो फेकून आंदोलन केले. शेटफळ येथे माढा रस्त्यालगत झालेल्या या आंदोलनाने सुमारे अर्धा तास महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली. Tomato Prices

या हंगामात उत्पादित झालेल्या टोमॅटोस कवडी मोलाचा दर मिळत आहे. उत्पादनावर होणारा खर्चही भागत नाही. अशातच शेटफळ येथील हनुमंत जाधव या शेतकऱ्याचा जवळपास पाच टन टोमॅटो व्यापाऱ्यांनी ४० पैसे प्रतिकिलो दराने मागितले. टोमॅटो तोडणी, वाहतूक व हमालीचा खर्च जवळपास प्रतिकिलो दीड रुपया होतो.

मात्र व्यापाऱ्यांनी ४० पैशांनी टोमॅटो मागितल्याने या शेतकऱ्याला संताप अनावर झाला आणि त्यांने रस्त्यावर टोमॅटो फेकून रास्ता रोखत आंदोलन केले. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला अनेक शेतकऱ्यांनी पाठिंबा देत टोमॅटोच्या दराबाबत Tomato Prices रोष व्यक्त केला. या शेतकऱ्याचे दोन एकर टोमॅटोचे क्षेत्र असून यासाठी याला अडीच लाख रुपये खर्च आला आहे.

मात्र आत्तापर्यंत या शेतकऱ्याला फक्त ७० हजार रुपयांचे उत्पादन मिळाले आहे. यामधून नफा राहीची तर लांबच गोष्ट मात्र उत्पादन खर्च देखील निघणे मुश्किल झाले आहे त्यामुळे शासनाने टोमॅटोला योग्य तो दर द्यावा अशी शेतकऱ्याने मागणी केली आहे.

माझे टोमॅटोचे दोन एकराचे क्षेत्र आहे. जवळपास यासाठी अडीच लाख रुपये खर्च झाला. एक आठवड्यात जवळपास १००० कॅरेटचे उत्पादन होते. आजपर्यंत केवळ ७० हजार रुपयांचे उत्पादन मिळाले आहे. नफा राहू द्यात, उत्पादन खर्चही निघत नाही.

शासनाने टोमॅटोला पंधरा रुपये प्रतिकिलो हमीभाव द्यावा. वावरभर मातीत पैसे फेकूनही आमच्या मालाची ही किंमत होत असेल तर आंदोलनाशिवाय आम्हाला पर्याय नाही.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!